बोगस बियाणे विक्री करणा:या महाबीज विरुद्ध कार्यवाही करा
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्वर वानखडे यांची मागणी
वरुड प्रतिनिधी। २ नोव्हेंबर – महाबीज कंपनीने तालुक्यातील शेतक:यांना चना (हरभरा) चे भुंग व किड लागलेल्या बियाण्यांची विक्री करुन शेतक:यांची फसवणुक करुन त्यांना पुन्हा संकटात टाकले. यामुळे प्रशासनातील संबंधित अधिका:यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करुन महबीज कंपनी विरुद्ध कठोर कार्यवाही करावी तसेच कंपनी मार्फत शेतक:यांना पुरेपुर मोबदला मिळवुन देण्याची मागणी कृषि शिक्षण व संशोधन परीषद पुणेचे सदस्य तथा डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्वर वानखडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकातुन केली आहे.
या पत्रकात नमुद केले आहे की, सदर बियाणे महाबीज कंपनी जी महाराष्ट्र शासनाची कंपनी आहे. त्या कंपनीने चना (हरभरा) चे बियाणे तालुक्यातील हातुर्णा येथील दोन शेतक:यांना विक्री केले. मात्र ते बियाणे पूर्णपणे भूंग व किड लागलेले आहेत. त्या बियाण्यांची उगवण क्षमता केवळ ५ टक्के आहे. असे बियाणे जर महाराष्ट्र शासनाच्या महाबीज कंपनीने शेतक:यांना विक्री करुन शेतक:यांची फसवणुक करुन त्यांना लुटण्याचा प्रकार करीत असेल तर या सरकारचे करावे तितके कौतुक कमीच आहे. यामुळे महाराष्ट्र शासनातील कृषिमंत्री दादा भूसे व त्याचे कृषि खात्यातील अधिका:यांना विनंती आहे की, त्यांनी सदर चना (हरभरा) च्या बियाण्यांचा पूर्ण स्टाँक जप्त करुन महाबीज कंपनी विरुद्ध कारवाई करुन हे बोगस बियाणे खरेदी करणा:या शेतक:यांना कंपनी मार्फत चांगल्या दर्जाची बियाणे देऊन झालेल्या नुकसानीचा पुर्ण मोबदला मिळवुन द्यावा. असे न केल्यास शेतक:यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा ईशारा सुध्दा महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परीषद पूणेचे सदस्य, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे कार्यकारी परीषद सदस्य तथा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष मोरेश्वर वानखडे यांनी दिला आहे.