विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लालूंना धक्का
ज्येष्ठ नेते रघुवंश प्रसाद यांचा रुग्णालयातूनच राजीनामा
नवीदिल्ली/दि. १० – बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह(RAGHU PRASAD SINGH) यांनी पक्षाचा राजीनामा दिला. रघुवंश ३२ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ होते. लालूप्रसाद यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी ते एक मानले जातात; परंतु लालूप्रसाद(LALU PRASAD YADAV) चारा घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात गेल्यापासून तेजस्वी यांनी पक्षाची धुरा सांभाळली. त्यांचे आणि तेजस्वी यांचे सूर जुळले नाहीत. तेजस्वीच्या काही निर्णयांमुळे आणि संयुक्त जनता दलातून रामा सिंह यांना राष्ट्रीय जनता दलात समाविष्ट केल्यामुळे ते संतापले. रघुवंश प्रसाद सध्या दिल्ली येथील एम्सच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांच्या फुफ्फुसांच्या आजारावर उपचार सुरू आहेत. त्यांनी लालू यादव यांना रुग्णालयातूनच राजीनामा पाठवला आहे. राजीनामा देताना त्यांनी लिहिले आहे, की जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या निधनानंतर आपण ३२व वर्षे तुमच्या पाठीशी होतो; पण आता नाही. पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना मोठा स्नेह मिळाला, मला वाईट वाटते. तेजस्वी यांनी वैशालीचे बाहुबली नेते रामा सिंह यांना राष्ट्रीय जनता दलात प्रवेश दिल्याने रघुवंश प्रसाद यांनी २३ जून रोजी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला; परंतु लालूंनी तो स्वीकारला नाही. लालूप्रसाद यादव यांनी रघुवंश प्रसाद यांचे मन वळवण्यासाठी तेजस्वीला दिल्लीला पाठवले; पण त्यांनी ऐकले नाही. रघुवंश प्रसाद आणि रामा सिंह हे दोघेही वैशाली जिल्ह्यातून आले आहेत. यावरून दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत रघुवंश प्रसाद यांचा रामा qसह यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. रघुवंश प्रसाद हे राष्ट्रीय जनता दलाचे एक महान नेते मानले जातात. त्यांनी पक्ष सोडल्याचा ‘टका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. रघुवंश प्रसाद यांचा प्रभाव तेजस्वी यादव यांचा विधानसभा मतदारसंघ राघोपुरातही आहे. पक्ष सोडल्यामुळे तेजस्वीची जागा अडचणीत येऊ शकते. रामा सिंग आता राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीत रमा सिंह तेजस्वीसाठी उपयुक्त ठरू शकतात. प्रसाद हे १९७७ मध्ये प्रथमच आमदार झाले. त्यानंतर ते पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी राज्यात राज्यमंत्री, केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री, केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री, ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम पाहिले.