मराठी

दलित आमदारांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष ज्येष्ठ आमदार बैरवा यांची तक्रार

राहुल गांधी यांना साकडे

जयपूर/दि.१३ –  राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे निशाण फडकते आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाबूलाल बैरवा यांनी, सरकारमध्ये दलित आमदारांचे ऐकले जात नाही. सरकारमध्ये बसलेले ब्राह्मण मंत्री दलितांसाठी काम करत नाहीत, असा आरोप केला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री गेहलोत यांच्या जातीतील माळी मतदारांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले नाही. सचिन पायलट यांच्या जातीच्या गुर्जरांनी काँग्रेसला मतदान केले होते. पायलट यांनी मला मत दिले होते, म्हणून मी त्यांचा आदर करतो. बैरावा म्हणाले की, चार महिन्यांपूर्वी पायलट यांनी बंड केले, तेव्हा सरकार वाचवण्यासाठी आम्ही गेहलोतबरोबर हॉटेलमध्ये थांबलो. पायलट यांनी मला गुज्जरांची मते मिळवून दिली; परंतु तरीही मी गेहलोतबरोबर राहिलो. मला काँग्रेसचे सरकार पडू द्यायचे नव्हते, म्हणून मी मुद्दामच पायलट यांच्याबरोबर गेलो नाही आणि गेहलोत यांच्याबरोबर राहिलो. मी पायलट यांचा ऋणी आहे. मी गुर्जरांच्या मतांनी qजकलो आहे. चौथ्यांदा आमदार झालेले बैरवा म्हणाले, की मी सहा वेळा निवडणुका qजकलेल्या ज्येष्ठ आमदार परसराम मोरदिया यांच्यासह इतर दलित आमदारांशी बोललो आणि सर्वांनी सांगितले, की आमचे काम सरकारमध्ये होत नाही. जेव्हा जेव्हा मी दलितांच्या कामासाठी कोणतीही कागदपत्र देतो, ते काम होत नाही. आरोग्य विभागातच चार बदल्या देण्यात आल्या त्यातील एक ब्राह्मण आणि तीन दलित होते. ब्राह्मणाचे नाव पाहून त्यांची बदली झाली, तर तिन्ही दलितांची बदली झाली नाही. राहुल गांधी म्हणतात, की भाजप दलित आणि अल्पसंख्यांकांना माणूस मानत नाही; परंतु इथेही काँग्रेस सरकारची परिस्थिती तशीच आहे. यासंदर्भात बैरावा यांनी राहुल यांना पत्र लिहिले आहे. वैद्यकीयमंत्री डॉ. रघु शर्मा आणि ऊर्जामंत्री डॉ. बी.डी. कल्ला यांना विचारणा करताना संभाषणात ते म्हणाले, की हे दोघे दलित आमदार आणि दलित कर्मचा-यांसाठी काम करत नाहीत. ते म्हणाले की, मी राजकारणात ४६ वर्षे राजकारणात आहे, स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यासह तुरुंगात गेलो; परंतु आम्हाला सरकारमध्ये प्राधान्य मिळत नाही आणि दुस-यांदा आमदार झालेल्या रघु शर्मा यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले.

पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

अलीकडे सचिन पायलट यांच्या माध्यम सल्लागारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुन्हा गेहलोत आणि पायलट यांच्यातील संघर्ष म्हणून त्याकडे पाहिले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, बैरवा यांनी गेल्या काही दिवसांत पक्षाच्या दलित आमदारांशी चर्चा केली आहे आणि दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींसमोर आपले म्हणणे मांडले आहे.

Related Articles

Back to top button