मराठी

मराठा आरक्षणावर तोडगा काढा

अशोक चव्हाणांची दिल्लीत वकिलांशी चर्चा

  • कोणतीही उणीव ठेवू नका;

मुंबई /६ नोव्हेंबर- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण  यांनी आज नवी दिल्ली इथं सरकारी वकिलांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या  प्रकरणाचा आढावा घेतला आहे. इथे झालेल्या भेटीत अशोक चव्हाण यांनी सरकारी वकील राहुल चिटणीस आणि सचिन पाटील यांच्याशी विचारविनिमय केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपिठाने 9 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गावर गंभीर परिणाम झाले असून, या प्रकरणी कायदेशीर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली.
आजपासून पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा
सोलापूर-उद्या निघणा:या मराठा समाजाच्या आक्रोश मोर्चाला ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिका:यांनी काल रात्री बारा वाजलेपासून दोन दिवस एसटी बस सेवा बंदकेल्याने बस स्थानक मोकळे पडले आहे . बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत . उद्या नामदेव पायरीपासून  पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा निघणार असून यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमा होण्याची शक्यता असल्याने एसटी बस सेवा बंद ठेवली आहे मात्र यामुळे दिवाळीच्या तोंडावर परगावी जाणाऱ्यांची अडचण झाली आहे

Related Articles

Back to top button