मराठी

आठ वर्षांच्या मुलीवर सात मुलांचा बलात्कार

त्रिपुरा गावातील घटना

आगरतळा/दि. ३१ – लपाछपी खेळण्यासाठी बोलावून सात अल्पवयीन मुलांनी आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. त्रिपुरातील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांना अटक केली असून, एक जण फरारी आहे. आरोपी अल्पवयीन मुलांपैकी चौघांची पोलिसांनी बालसुधारगृहात रवानगी केली आहे. साधारण १२ वर्षे वयाच्या दोन मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ते दोघेही कोरोना बाधित आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलांनी मुलीला लपाछपी खेळण्यासाठी बोलावले. त्यानंतर तिला सोबत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

Related Articles

Back to top button