मराठी

शापूरजी आणि टाटा ग्रुप पुन्हा आमने-सामने

नवी दिल्ली/दि. १२ – शापूरजी पालनजी ग्रुप(Shapoorji Pallonji Group) आणि टाटा सन्स(TATA SONS) पुन्हा एकदा समोरासमोर येत आहेत. या प्रकरणात शेअर्स गहाण ठेवून निधी गोळा करण्याशी संबंधित आहे. वास्तविक, टाटा समूहाने समभाग गहाण ठेवण्याच्या मिस्त्रीचा प्रयत्न रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.

टाटा सन्सने पाच सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. टाटा सन्सच्या शेअर्समधून भांडवल उभारण्यासाठी मिस्त्री ग्रुपचे प्रयत्न थांबविणे हे यामागील उद्दीष्ट आहे. शापूरजी पालनजी ग्रुप विविध फंडांच्या माध्यमातून 11 हजार कोटी रुपये उभे करण्याचा विचार करीत आहे. या ग्रुपने पहिल्या टप्प्यात कॅनडाच्या गुंतवणूकदाराबरोबर टाटा सन्समधील भागभांडवलसाठी साडेसात हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. टाटा सन्समधील शापूरजी पालनजी ग्रुपचा भाग एक लाख कोटींपेक्षा जास्त आहे. शापूरजी पालनजी ग्रुपने कॅनेडियन गुंतवणूकदाराबरोबर स्वाक्षरी केल्यावर टाटा सन्सने एक दिवसानंतर हे पाऊल उचलले.

Related Articles

Back to top button