मराठी

शरद पवार यांनी भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाचे जाहीर अभिनंदन केल

मुंबई/दि.२८– राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचा कालपर्यंत मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाचे जाहीर अभिनंदन केले आहे. कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून अकाली दल भाजपाची साथ सोडून भाजपा प्रणित एनडीएतून बाहेर पडल्याबद्दल पवारांनी ट्विट करत त्यांचे अभिनंद केले आहे. केवळ पवारांनीच नाही, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही एक ट्विट करत अकाली दलाचे कौतुक केले आहे.
एनडीएची (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) स्थापन झाल्यापासूनच अकाली दल आणि शिवसेना हे दोन महत्वाचे पक्ष भाजपासोबत होते. अकालीदल एनडीएतून बाहेर पडण्यापूर्वी, म्हणजेच साधारणपणे 10 महिन्यांपूर्वी, महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपाला दणका दिला. एवढेच नाही, तर सेनेने केंद्रातही भाजपाची साथ सोडली आणि ते एनडीएतून वेगळे झाले. यानंतर भाजपाला अकाली दलाच्या रुपात बसलेला हा दुसरा धक्का आहे.
अकाली दलाने केंद्राच्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवला. याच मुद्द्यावर हरसीमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देताच, आपला पक्ष एनडीएतून बाहेर पडत असल्याची टोकाची भूमिका घेतली. यामुळे भविष्यात भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
्रअकाली दलाच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे अनेक पक्षांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट केले आहे. यात, अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाश सिंग बादल. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि खासदार हरसीमरत कौर बादल यांचा उल्लेख करत, कृषी विधेयकांना विरोध करून एनडीएतून बाहेर पडल्याबद्दल आपले अभिनंदन. तसेच आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल आभार, असे पवारांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button