शरद पवार म्हणतात, मला लसीची गरज नाही

पुणे दी २– सिरम इन्स्टिट्यूट येथे कोरोनाच्या लसीचे काम सुरू आहे. ही लस जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तयार होईल अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. लोकांना वाटते की मी लस घेतली आहे.
लोक खासगीत सिरमचे प्रमुख हे शरद पवारांचे मित्र आहेत त्यांनी आधीच लस घेतली असेल अशी चर्चा करतात. पण मी लस घेतली नाही. केवळ प्रतिकार शक्ती वाढविण्याचे आरबीसीजी ट्रिपल बूस्टरचे इंजेक्शन घेतले आहे आणि माझ्या सर्व स्टाफला ही दिले आहे. मला लसची गरज भासणार नाही माझी प्रतिकारशक्ती चांगली आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीची लस तयार आहे
भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी वन फाईन मॉर्निंग बाबत दिलेल्या प्रतिक्रियेवर शरद पवार म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटील हे नेहमीच कपडे घालून तयार असतात. परंतु साडेचार वर्षे त्यांनी वाट पहावी. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.