मराठी

शेतक-यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्याने शिवसैनिकांत संताप

स्थानिक दत्तचौकात शिवसेनेने केले उग्र आंदोलन

यवतमाळ दि १२ – केन्द्र सरकारने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतक-यांचे सुरु असलेलेआंदोलन पाकिस्तान तसेच चीनचे षडयंत्र असल्याची टिका केन्द्रीय राज्य मंत्री तसेच भाजपाचे नेतेरावसाहेब दानवे यांनी नुकतीच केली. या वक्तव्याच्या विरोधात आज यवतमाळात शिवसैनिकांचा संतापअनावर झाल्याने त्यांनी रावसाहेब दानवेंचा पुतळा भरचौकात तुडवला.
भाजपाचे सरकार कुठलाही गंभीर विषय समोर आला की बुध्दीभेद करतांना दिसून येते. वेगवेगळयाविषयांत गुंतवून नागरीकांची दिशाभूल करण्याचे कार्य भाजपाचे सरकार करीत आहे. आता तर काळया कृषीकायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असतांना त्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान तसेच चिनचेषडयंत्र असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले असून हे सर्व लज्जास्पद असल्याची टिका परागपिंगळे यांनी केली आहे. या प्रसंगी शिवसेनेच्या सर्वच पदाधिका-यांनी देशभरात वाढत असलेल्या पेट्रोलतसेच डिजल भाववाढीच्या विरोधात संताप व्यक्त केला. यानंतर शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांचापुतळा भरचौकात तुडवला. त्यानंतर पोलिसांनी पुतळा जप्त केला. या प्रसंगी पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड,संतोष ढवळे, किशोर इंगळे, संजय रंगे, सागरताई पुरी, पिंटू उर्फ नितीन बांगर यांनी उपस्थितांना संबोधितकेले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळविधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, उपजिल्हा प्रमुख किशोरइंगळे, तालुका प्रमुख संजय रंगे, शहर प्रमुख नितीन बांगर, बोरी शहर प्रमुख रवी जाधव,महिला जिल्हासमन्वयक सागरताई पुरी,महिला जिल्हा संघटिका मंदाताई गाडेकर,महिला जिल्हा संघटिका निर्मलाताईविनकरे,शहर संघटिका काजलताई कांबळे,युवासेना उपजिल्हा प्रमुख अमोल धोपेकर, व्यापारी आघाडीशहर प्रमुख संतोष चव्हाण, व्यापारी आघाडी तालुका प्रमुख मनीष लोळगे,ऑटो रिक्षा संघटना जिल्हासंघटक रुपेश सरडे, ऑटो रिक्षा संघटना तालुका प्रमुख नितीन यादव,ऑटिरिक्षा संघटना शहर प्रमुख प्रदीपफरकडे,शेतकरी व शेतमजूर आघाडीचे जिल्हा संघटक अशोक पुरी,हिंदी भाषिक व उत्तर भारतीय आघाडीचेजिल्हा संघटक अनिल यादव,भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा संघटक सचिन राठोड,विधी व न्यायविभागाचे अभिजित बायस्कर,भीमशक्ती आघाडीचे दशरथ शेजुळकर,शिवसेना प्रणित शिक्षक आघाडीचे प्राराजेश चव्हाण,भीमशक्ती आघाडीचे जिल्हा संघटक संजय कांबळे,पंचायत समिती सदस्य गजाननपाटील,निलेश लडके,आदिवासी आघाडीचे विधानसभा संघटक
दीपक उमरे,अरुण वाकळे,उपतालुका प्रमुख डॉ अनिल नाईक,सुरेश ढेकळे,गुणवंत ठोकळ,विभाग प्रमुखविशाल चव्हाण,मंदाताई गुडधे,स्मिताताई दुर्गे,वैशाली किनाके,रवी राऊत,गिरीजानंद कळंबे,सुनीलकटकुळे,पद्माकर काळे,पवन शेंद्रे,संतोष गडई,राजेंद्र कोहरे,अभय व्यास,राजेंद्र गिरी,उद्धवराव साबळे,विनोदराऊत,संजय कोल्हे,राजू मेहरे,सुरेश चुनारकर,कृष्णराव इरवे,ज्योती चिखलकर,संगीता पुरी,उमेशपुडके,प्रमोद मेश्राम,गोलू मिरासे,अतुल कुमटकर ,सचिन बारसकर,राहुल गंभीरे,संजय राठोड,गजाननइंगोले,शंकर देऊळकर,शैलेंद्र तांबे,राजेंद्र कोहरे,राजू राऊत,गिरीश व्यास,विनोद पवार,चेतन क्षीरसाठ,अतुलगुल्हाने,पंकज देशमुख,प्रभाकर बहादुरे,शैलेंद्र तांबे,पप्पू गजभे, संजय उपगनलावार, राजू शेख,दीपकसुकळकर,तुषार देशमुख,संजय कोल्हे,सुनील कटकुळे,सुधीर मेंधळकर,हेमंत उगले,विजय माळवी,संजयनेमाडे,प्रतीक पिंपळकर,सतीश सकट, प्रदीप फरकडे, ,दिनेश इंगळे,महेश खाडे,शुभम खाडे, प्रसाद अवसरे,हृषीकेश इलमे, अभिनव वाडगुरे, गोलू जोमदे,राजू शेख, भूषण काटकर उपस्थित होते.

  • रावसाहेब दानवे नशेत टीका करतात

याआधी सुध्दा रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांना साले अशी शिवी दिली होती. आता पुन्हा शेतक-यांच्याआंदोलनाला गालबोट लावण्याचे काम दानवे करीत आहे. हे सर्व ते मद्य पिऊन करतात काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

  • जीभ कापणा-यास दहा लाख

रावसाहेब दानवे हे सतत शेतक-यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची जीभ कापणा-यासदहा लाख रुपयांचे रोख बक्षीस तसेच बारा लाखाची गाडी भेट देण्यात येईल अशी घोषणा मी आज केली. मी त्यांची जीभ कापायला निघालो आहे तुम्हीही निघा. शेतक-यांचा अपमान आम्ही सहन करु शकत नाही.

  • रावसाहेब दानवेंना मंत्री पदावरुन निष्कासीत करा

रावसाहेब दानवे हे नेहमीच शेतकरी विरोधी वक्तव्य करीत असतात. मागेही त्यांनी शेतकऱ्यांना सालेम्हणून शिवीगाळ केली होती. आता शेतकरी आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तान आहे असे बेताल वक्तव्यत्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर शेतकाऱ्यांविषयी संवेदना असतील तर त्यांनी त्वरितरावसाहेब दानवे यांना मंत्रीपदावरून निष्कसित करावे व भाजप मधून बाहेरचा रस्ता दाखवावा.

 

 

Related Articles

Back to top button