शिवसेनेचा मेळावा व्यासपीठावरच ऑनलाईन मेळाव्याचे वृत्त निराधार असल्याचा दावा

मुंबई/दि.१७ – दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा असेल. दसरा मेळाव्याचे महत्व राजकीय आणि सांस्कृतिकदेखील आहे. दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होईल. नियम आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य होईल, अशा पद्धतीचे नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याची जोरदार चर्चा होत होती. या चर्चांना राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. कुणी सांगितले शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले, तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचे भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, असे सांगत राऊत यांनी शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार असल्याचे संकेत दिले आहेत. येत्या २५ ऑक्टोबरला दसरा आहे. हा दसरा मेळावा ऑनलाईन न होता व्यासपीठावरच होणार असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाइन होत आहेत. पण मी आजच वाचलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये १२ सभा घेणार आहेत. त्या कशाप्रकारे सभा घेतात त्याचा आम्ही अभ्यास करून नियम वैगरे आहेतच. शेवटी या राज्यात मुख्यमंत्रिपदी ठाकरे आहेत. सरकारने काही नियम केले आहेत. कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही, असे सांगतानाच दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यावर निर्णय होईल. बèयाच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.