मराठी

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा आणि आरपीआय ला लगावला टोला

मुंबई/दि.३० – उत्तर प्रदेशात तरुणीवर बलात्कार प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप सरकार आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशला रामराज्य म्हटले जाते. तिथं एक मुलीवर बलात्कार, खून होतो आणि आरोपींना वाचवलं जातं. इतरत्र मात्र कुणाच्या घरावरील कौले जरी उडवली जातात एका अभिनेत्रीच्या तेव्हा अन्याय म्हटले जाते. आता रामदास आठवले कुठं आहेत ? असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावलाय.कंगना राणावतचे कार्यालय पालिकेने तोडल्यानंतर कंगनावर अन्याय झालाय अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतली होती आणि पालिकेवर निशाणा साधला होता. त्यांनी कंगनाची भेट घेत तिला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देखील दिले होते. त्यानंतर कंगनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.

Back to top button