मराठी

शिवसेना यवतमाळ विधानसभा आढावा बैठकीचे आयोजन

 यवतमाळ/दि.२५ – शिवसेना विदर्भ समन्वयक श्री अरविंद नेरकर यांचे आदेशान्वये आज यवतमाळ विधानसभा आढावा बैठकीचे आयोजन स्थानिक टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले.
ह्या बैठकीत कोरोना काळात शिवसेना पक्षातर्फे घेतलेले उपक्रम,शिवसेनेची ग्रामीण व शहर संघटना बांधणी,येत्या काळात येणाऱ्या नगर पालिका व जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक तयारी विषयक आढावा तसेच शिवसेना प्रणित संघटना व त्या अनुषंगाने पदाधिकारी नेमणुका करणे बाबत आढावा घेण्यात आला.
ह्या प्रसंगी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे,तालुका प्रमुख संजय रंगे इत्यादींनी मार्गदर्शन केले.
शिवसेनेचे ना संजय राठोड हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,मा भावनाताई गवळी खासदार आहेत,शिवसेनेचेच दुष्यांत चतुर्वेदी नुकतेच विधानपरिषदेवर निवडून आले आहेत त्यामुळे शिवसेनेविषयी सध्या युवकांमध्ये  खास आकर्षण आहे त्यामुळे
येत्या काळात शिवसेनेत खूप मोठ्या प्रमाणात विविध पक्षातून येणाऱ्या स्थानिक नेत्यांना प्रवेश दिला जाईल तसेच येणाऱ्या काळात पक्ष संघटन मजबूत करणे साठी यवतमाळ विधानसभेत पंचायत समिती स्तरावर तसेच शहरात प्रभाग स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येईल तसेच शिवसेना पक्ष सदस्यता नोंदणी अभियान देखील राबवण्याचे ह्या बैठकीत सर्वानुमते ठरले.
बैठकीला जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड ,श्री बाळासाहेब चौधरी,निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे,उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे,उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे,तालुका प्रमुख संजय रंगे,शहर प्रमुख पिंटू उर्फ नितीन बांगर,जिल्हा परिषद सदस्य सचिन राठोड,विनोद खोडे पाटील,पंचायत समिती सभापती कांबळे ताई,पंचायत समिती सदस्य एकनाथ तुमकर, गजानन पाटील,अरुण वाकळे, सुरेश ढेकळे, गुणवंत ठोकळ,महिला आघाडी जिल्हा समन्वयक सागरताई पुरी,माधुरीताई अराठे,जिल्हा संघटिका निर्मला विनकरे,लताताई चंदेल,महिला आघाडी शहर संघटिका कल्पना दरवई,युवासेना उपजिल्हा प्रमुख अमोल धोपेकर,विशाल गणात्रा,नगर सेवक व शिवसेना गटनेता गजानन इंगोले,निलेश बेलोकर,अनिल यादव,उद्धव साबळे,पंकज देशमुख,संगीता राऊत,वैशाली कनाके, तसेच यवतमाळ विधानसभेतील विभाग प्रमुख व लोकप्रतिनिधी उपस्थित होते

यवतमाळ विधानसभेत शिवसेनेची मजबूत बांधणी करणार

येत्या काळात सोबत येणाऱ्या प्रत्येकाला सोबत घेऊन शिवसेनेची मजबूत बांधणी करणार.येत्या नगर परिषद,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी एकत्रित प्रयत्न करणार आहोत.शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अनेक पक्षातील स्थानिक नेते तयार आहेत. पक्षातील वरिष्ठांशी त्या संमधीत चर्चा करून व येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान ठेऊन शिवसेनेत त्यांना प्रवेश दिला जाईल.

Related Articles

Back to top button