मराठी

शिवसेनेच्या पाठपुराव्याने मत्स्य व्यवसायाचा कंत्राट रद्द

निळोणा, चापडोप धरण परीसरातील भोई समाजाला मिळाला न्याय

यवतमाळदी/१४- शहराला पाणी पुरवठा करण्यात येणा-या चापडोड तसेच निळोणा धरणातील मत्स्य व्यवसाय करण्याचा कंत्राट अखेर रद्द करण्यात आला आहे. हा कंत्राट पारंपारीक पध्दतीने मत्स्यव्यवसाय करणा-या भोई समाजावर अन्याय करणारा असल्याने शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख दशरथ मांजरेकर, संतोष ढवळे, शिवसेना शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी सरकारकडे नागरीकांच्या व्यथा मांडून अखेर हा कंत्राट रद्द करुन घेतला आहे. यामुळे आता परीसरातील भोई समाज पुन्हा एकदा मत्स्य व्यवसाय करण्यास मोकळा झाल्याने भोई समाजाने शिवसेना पदाधिका-यांचे आभार मानले आहे. निळोणा चापडोह धरणावर मत्स्य व्यवसाय करण्यासाठी वादग्रस्त पद्धतीने निविदा काढून करण एजन्सीला कंत्राट देण्यात आला होता. या धरणावर मत्स्य व्यवसायासाठी काढण्यात आलेल्या निविदा रद्द करून पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या भोई समाजाला मत्स्यव्यवसाय करण्याची परवानगी मिळावी या मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ निळोणा चापडोह धरण मत्स्य संघर्ष कृती समिती यांनी उपोषण सुध्दा केले होते. यानंतर संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी शिवसेनेचे पदाधिकारी विशाल बरोरे यांच्यामार्फत शिवसेनेचे संतोष ढवळे तसेच शहर प्रमुख पिंटु बांगर यांची भेट घेतली. याव्यतिरीक्त खासदार भावनाताई गवळी यांची भेट घेऊन त्यांच्यावर होत असलेला अन्याय कथन केला. दरम्यान खासदार भावनाताई गवळी यांनी अधिक्षक अभियंता जीवन प्राधिकरण विभाग यांना पत्र देऊन कंत्राद रद्द करण्याच्या सुचना दिल्या. शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख दशरथ मांजरेकर यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी थेट जळगाव येथे जाऊन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन मत्स्य व्यावसाईकांची व्यथा सांगीतली. ही व्यथा एैकुन गुलाबराव पाटील यांनी तातडीने चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान चौकशी अंती नुकताच जीवन प्राधीकरण चे कार्यकारी अभियंता श्री. प्र.अ. व्यवहारे यांनी हा कंत्राट रद्द केला आहे. कंत्राट रद्द झाल्यामुळे परीसरातील जवळपास अडीचशे मत्स्य व्यावसाईकांना आपला परंपरागत मत्स्य व्यवसाय करता येणार आहे. यामुळे मत्स्य व्यावसाईकांनी शिवसेनेच्या पदाधिका-यांचे आभार मानले आहे.

 अन्यायग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना

 कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाल्यास शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. यासाठी आम्ही शहरात सुध्दा अनेक ठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरु केली आहे. नागरीकांनी अन्याय झाल्यास शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा. आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु.

Back to top button