मराठी

चार महिने शिवस्मारक राहणार बंद

फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील गोपनीयता उघड

मुंबई/दि.९ – अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पावसाळ्यातील चार महिने बंद ठेवावे लागणार आहे, अशी माहिती सल्लागार कंपनीने उघड केली आहे. आजपर्यंत ही बाब तत्कालीन फडणवीस सरकारने गुप्त ठेवली होती. चार महिने स्मारक बंद न ठेवण्याबाबतच्या उपायांची चाचपणी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.
फडणवीस सरकारच्या काळात शिवस्मारकाची पायाभरणी झाली होती. तसेच स्मारकाचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजन झाले होते; मात्र 3600 कोटी खर्चून बांधलेजाणारेस्मारक पावसाळ्यातील चार महिने समुद्र सुरक्षित नसल्याने बंद ठेवावे लागणार असल्याचेउघड करण्यात आले नव्हते. स्मारकासंदर्भात आढावा बैठकीत प्रकल्प सल्लागार कंपनी इंजिज इंडियानेस्मारकाची वस्तुस्थिती मांडली. दिवसाला स्मारकाला 25 हजार प्रवासी भेट देतील; मात्र स्मारक वर्षातील चार महिनेबंद ठेवावे लागेल. त्यावर चव्हाण यांनी पर्याय विचारला. तेव्हा रोपवे, सागरी सेतू किंवा भुयारी मेट्रो पर्याय असल्याचे सांगितले. त्यातील भुयारी मेट्रो पर्याय व्यवहार्य असून त्यासाठी अधिकचा 1500 कोटी खर्च वाढणार असल्याची बाब सल्लागार कंपनीने निदर्शनास आणली.
समुद्राखालून रेल्वेचे अनेक प्रकल्प झालेलेआहेत; पण शिवस्मारकाचेएक टोक जमिनीवर तर दुसरेटोक समुद्रात आहे. तसेच सध्याचा स्मारकाचा आराखडा आहे, त्यात भुयारी रेल्वेचे नियोजन नाही.
पर्यावरणाच्या अनुषंगाने स्मारकाचा वाद न्यायालयांमध्ये असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तूर्तास स्मारकाचेकाम थांबलेलेआहे.

Back to top button