मराठी

डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास कारणे दाखवा नोटीस

नागरिकांच्या तक्रारी आल्यास कंत्राटदारांना दंड

अमरावती दि २२- शहरातील स्वच्छतेबाबत महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी गंभीरतेने दखल घेतली असून प्रभागातील तक्रारीबांबत वेगवेगळी ठिकाणेही निश्चित केली आहेत. प्रभागातून तक्रारी आल्यास कंत्राटदारांना दंड ठोठावण्यात येणार असून डेंग्यूचा रुग्ण निघाल्यास त्या प्रभागातील कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे गुरूवारच्या आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
आयुक्त प्रशांत रोडे यांचे अध्यक्षतेखाली स्वच्छता विभागातील कंत्राटदारांची बैठक मनपा कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्तांनी सर्व कंत्राटदारांना सूचना केल्या. स्वच्छ सर्वेक्षणाच्या नियमावलीप्रमाणे सर्वांनी काम करावे. अमरावती शहरात कुठेही गटार साचलेले राहू नये याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी तुंबलेल्या गटाराचे जीओ टॅग फोटो संबंधित कंत्राटदारांना पाठवावे. एखादी तक्रार दुरुस्त होत नसल्यास त्वरित वरीष्ठांना सुचित करावे, तसेच ज्या सूचना दिल्या जाईल त्याचे तंतोतंत पालन करावे. प्रभागातून तक्रारी आल्यास संबंधित कंत्राटदाराला दंड करण्यात येईल. कामगाराच्या खात्यात पैसे टाकल्याचा पुरावा देणेही यापुढे कंत्राटदारांना बंधनकारक राहणार आहे. दर महिन्याला बिल टाकणे अनिवार्य राहील. डेंग्युचे रुग्ण ज्या प्रभागात निघत आहे त्या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. तसेच कंत्राटदाराकडे असणारी यंत्रसामुग्री प्रशासनाकडून येणार्‍या काळात तपासण्यात येणार आहे.

  • तक्रार करण्याची ठिकाणे

श्री साई सुशिक्षित बेरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.1 शेगावं रहाटगाव, विजय बालकिसन गंगण प्रभाग क्र.2 पीडीएमसी, संजय रामराव हिरपुरकर प्रभाग क्र.3 नवसारी, सुशिक्षित बेरोजगारांची सागर नागरिक सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.4 जमील कॉलनी, श्याम बबनराव शिनगारे प्रभाग क्र. 5 महेंद्र कॉलनी, ईश्वर मेहतर सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.6 विलास नगर-मोरबाग, गोविंदा सफाई कामगार नागरिक सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.7 जवाहर स्टेडीयम, मैत्री सुशिक्षित बेरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.8 जोग स्टेडीयम, राष्ट्रमाता जिजाऊ महिला बचत गट प्रभाग क्र.9 एसआरपीएफ वडाळी, सम्यक नागरिक सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.10 बेनोडा, मैत्री सुशिक्षित बेरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.11 फ्रेजरपुरा, विकास गंगा नागरिक सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.12 रुक्मिणीनगर, बेरोजगारांची श्रमिक नागरिक सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.13 अंबापेठ, अफसर खॉ मिया खॉ प्रभाग क्र.14 बुधवारा, मो. ईरशाद अब्दुल सत्तार प्रभाग क्र.15 छायानगर-पठाणपुरा, श्री नागरिक सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.16 अलीमनगर, सुशिक्षित बेरोजगारांची जगदंबा मरीमाता सफाई कामगार सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.17 गडगडेश्वर, श्री संत वारकरी महिला बचत गट बडनेरा प्रभाग क्र.18 राजापेठ, श्री साई सुशिक्षित बेरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.19 साईनगर, सुशिक्षित बेरोजगार नवकिरण नागरिक सेवा संस्था प्रभाग क्र.20 सुतगिरणी, बैरमबाबा सेवाभावी सफाई कामगार सेवा सहकारी संस्था बडनेरा प्रभाग क्र.21 जुनीवस्ती, शारदा महिला बचत गट प्रभाग क्र.22 नवीवस्ती बडनेरा, बेरोजगारांची महाराष्ट्र नागरिक सेवा सहकारी संस्था प्रभाग क्र.23 संपूर्ण बाजार

Related Articles

Back to top button