मराठी

मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव

शंभरापेक्षा जास्त अध्यक्ष आणि महापौरांनी घेराव घातला

भोपाळ/दि.१७ – मध्य प्रदेशातील नगरपालिकांच्या अध्यक्षांनी सरकारच्या अडचणी वाढवल्या आहेत. भोपाळच्या श्यामला हिल्समध्ये असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानावर राज्यभरातील शंभरापेक्षा जास्त अध्यक्ष आणि महापौरांनी घेराव घातला. नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपांचायतींचा कार्यकाळ वाढविण्याच्या मागणीसाठीही घोषणाबाजी करण्यात आली. श्यामला हिल्समधील सीएम हाऊस येथे झालेल्या निदर्शनाच्या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा मोर्चा मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर अडविला गेला. मुदत संपलेल्या नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षांना मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारी अधिका-यांच्या हाती कारभार देण्यास या लोकप्रतिनिधींचा विरोध होता. आंदोलनात भाजप पदाधिका-यांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच राज्यभरातून पालिका अध्यक्ष, महापौर सीएम हाऊसमध्ये पोहोचू लागले. त्यामुळे तेथे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर गर्दी ज्मली; परंतु कोणीही मुख्यमंत्र्यांना भेटले नव्हते. एप्रिलमध्ये नियुक्त्या झाल्या असताना आता लगेच निवडणूक घेण्याची गरज नाही. काहींचा तर नियुक्तीनंतर शपथविधी झालेला नाही. मागण्यांकडे लक्ष न दिल्यास कोणत्याही स्तरावर जाऊन आंदोलन करण्याची तसेच राज्यातील भाजपला धडा शिकवण्याची भाषा या आंदोलकांनी केली. त्याचा फटका विधानसभेच्या आगामी पोटनिवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button