मराठी

1 ऑक्टोबरपासून वाहतूक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

वाहनचालक परवान्याची पोलिसांकडून होणार पडताळणी

नवी दिल्ली/दि.२७ – केंद्र सरकारने मोटर वाहन नियम 1989 मध्ये दुरुस्ती केली असून, 1 ऑक्टोबर 2020 पासून वाहतूक संदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आता वाहनचालक परवाना आणि ई-चालान सहित वाहनांशी संबधित कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये अधिकृत आढळलेल्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होणार नाही.
वाहन चालवताना खोटी कागदपत्रे दाखवून वाहतूक पोलिसांकडून सुटका करता येऊ शकते, असा अनेकांचा गैरसमज आहे. बर्याचदा पोलिसांकडून कागदपत्रांची सत्यता पडताळणी होत नाही, हे देखील खरे आहे. पण, केंद्र सरकारच्या नवीन सुधारित अधिनियमांमुळे यापुढे असे होणार नाही. आता वाहतूक पोलिसांकडे तुमची कागदपत्रे आधीच असतील.

परवान्याची अधिकृत माहिती

वाहतूक पोलिसांकडे तुमच्या वाहनचालक परवान्याशी संबंधातील सर्व माहिती आधीच असणार आहे. तसेच रद्द किंवा अवैध झालेल्या परवान्याची माहिती देखील यावर असणार आहे. ही माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाणार आहे. मोटर वाहन नियम 1989 मध्ये केलेल्या विविध संशोधनासंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. यामध्ये मोटर वाहन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल आहेत. यानुसार 1 ऑक्टोबरपासून पोर्टलच्या माध्यमातून वाहनांसंदर्भातील कागदपत्रे आणि ई-चालानची माहिती वाहतूक विभागाकडे साठवली जाईल आणि वेळोवेळी अद्ययावत होईल.

Related Articles

Back to top button