मराठी

लक्षणीय वाढीचा अंदाज

उत्तरार्धात वास्तविक जीडीपी लक्षणीय वाढेल

नवी दिल्ली/दि. २६ – ‘मूडीज इन्व्हेस्टर सर्विस‘(Moody’s Investors Service) ने जी -२० उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत, चीन आणि इंडोनेशिया हे एकमेव असे देश आहेत, जिथे २०२० च्या उत्तरार्धात वास्तविक जीडीपी लक्षणीय वाढेल, असे म्हटले आहे. २०२० मध्ये भारताची आर्थिक वाढ ३.१ टक्के कमी होण्याचा अंदाज आहे. २०२०-२१ च्या जागतिक स्थूल परिस्थितीबद्दल ‘मूडीज‘ने आपल्या ताज्या अहवालात भाष्य केले आहे. विकसित देशांपेक्षा विकसनशील देशांकरिता आर्थिक परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे. २०२१ साठी ‘मूडीज‘ने भारताच्या अर्थव्यवस्थेत ६.९ टक्के वाढीचा अंदाज वर्तविला आहे.
२०१९-२०२० मध्ये देशाचा आर्थिक विकास दर २.२ टक्के होता, जो ११ वर्षातील सर्वांत नीचांकी आहे. आर्थिक पुनरुज्जीवन सुरू आहे; परंतु कोरोनाचा सामना कसा केला जातो, त्यावर पुनरुज्जीवनाची गती अवलंबून आहे.

Related Articles

Back to top button