मराठी

अर्थव्यवस्थेत तेजीचे संकेत

मुंबई/दि ३०  – नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यापर्यंत डिझेलची मागणी, वाहन नोंदणी आणि ई-वे बिलासारखे आकडे अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे निदर्शक आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
वाहनाच्या खपाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च दरम्यान दररोज 88 हजार 331 वाहनांची नोंद झाली. एप्रिलमध्ये हा आकडा 17 हजार 102 वर आला. मेमध्ये नऊ हजार 454 वाहनांची नोंदणी झाली, तर जूनमध्ये वाहनांची दैनंदिन खपाचा आकडा 45 हजार 388 वर गेला. ऑक्टोबरमध्ये हा आकडा 65 हजारांच्या पुढे गेला आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत दररोज 79 हजार 554 गाड्यांची नोंद झाली. सणासुदीच्या काळात वाहनांची मागणी वाढली. नोव्हेंबरमध्ये तेजी दिसून येत आहे. कोरोनानंतरची ही पहिलीच वेळ आहे जेव्हा गाड्यांची मासिक नोंदणी या पातळीवर गेली. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगणाची मिळालेली नाही. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये ई-वे बिल 5.5 कोटी होते. यावर्षी सप्टेंबरमध्ये 5.7 कोटी, ऑक्टोबरमध्ये 6.4 कोटी आणि 22 नोव्हेंबरपर्यंत 4.1 कोटी होते. कोविडपूर्वी मासिक सरासरी ई-वे बिल 5.5 कोटी होते. विजेची मागणी 25 नोव्हेंबरपर्यंत ते 154.1 गिगावॉट होती. नोव्हेंबर 2019 मध्ये हीच मागणी 150.3 गिगावॉट होती. पेट्रोल आणि डिझेलचीही मागणी वाढली आहे. पेट्रोलच्या मागणीत 7.7 टक्के, तर एलपीजीत दोन टक्के वाढ झाली आहे. मासिक आधारावर नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात डिझेलची मागणी 7.7 टक्क्यांनी वाढली. वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) ऑक्टोबरमध्ये संकलन एक लाख पाच हजार कोटी होते. नोव्हेंबरमध्ये ते एक लाख आठ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. ऑक्टोबरमध्ये ते 10 टक्कयांनी वाढले आहे.

 

Related Articles

Back to top button