सहाशे कोटी वाटले, स्वतः सेकंड हँड गाडीत !
लंडन/दि. ११ – ब्रिटनमधील एका जोडप्याला लाॅटरीत ११३० कोटी रुपयांचे बक्षीस लागले. नातेवाइक आणि इतरांना आर्थिक अडचणीतून दूर करण्यासाठी या दांपत्याने स्वतः कडील सहाशे कोटी रुपयांचे वाटप केले; परंतु स्वतः साठी मात्र सेकंड हँड गाडी घेतली.
ब्रिटनमध्ये फ्रान्सिस कॉनोली या जोडप्याने लॉटरीमध्ये सुमारे 1130 कोटी रुपये जिंकले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यातील 600 कोटी मित्र व नातेवाइकांमध्ये वाटून त्यांनी इतरांची दयनीय अवस्था सुधारली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ज्यांना या दांपत्याने मदत केली, त्यांनीही इतर लोकांना त्यांच्या आर्थिक स्थितीत मदत केली. या जोडप्याने पूर्वी ठरवले होते, की आपण त्यांना ओळखत असलेल्या 50 लोकांना मदत करू. नंतर त्यांनी 175 कुटुंबांना लॉटरीचे पैसे वितरित केले. त्यामुळे त्यांना नवीन घरे खरेदी करता आली तसेच कर्ज फेडता आले. त्याने ज्या लोकांना मदत केली, त्यांचा विमा देखील काढला. याव्यतिरिक्त, त्यांनी एक हजार लोकांसाठी भेटवस्तू देखील खरेदी केल्या. त्या ख्रिसमसच्या वेळी रुग्णालयात पाठविले जाईल. जे घराबाहेर आहेत, त्यांना भेटवस्तू पाठविण्याची व्यवस्था केली.
आपल्या कुटुंबासह आणि मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी त्याने 30 संगणक आणि 20 लॅपटॉप विकत घेतले. ही रक्कम फ्रान्सिस आणि तिचा नवरा पॅट्रिक यांनी ब्रिटनच्या द नॅशनल लॉटरीच्या युरो मिलियन प्रोग्राम अंतर्गत जिंकली. 54 वर्षांची फ्रान्सिस म्हणते, की इतरांच्या चेह-यावर आनंद पाहणे हे दागदागिने खरेदी करण्यापेक्षा अधिक चांगले आहे आणि त्यातच तिला अधिक आनंद झाला. इतके पैसे मिळूनही त्यांनी स्वत: साठी सेकंड हँड कार खरेदी केली.