मराठी

जिल्ह्यात आतापर्यंत १४३० रुग्णांची कोरोनावर मात

२४ तासात दोन मृत्यु, ३० जण नव्याने पॉझेटिव्ह, १६ जणांना सुट्टी

यवतमाळ, दि. 16 : वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 16 जण बरे झाल्यामुळे त्यांना आज (दि.16) रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनावर मात करणा-यांची संख्या 1430 झाली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 30 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2168 पर्यंत पोहचली आहे. यापैकी तब्बल 1430 जण डॉक्टरांच्या अथक मेहनतीमुळे ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाले आहे. गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्यु झाले. यात यवतमाळ शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील 60 वर्षीय महिला आणि सेवा नगरातील 62 वर्षीय महिलेचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 30 जणांमध्ये 16 पुरुष व 14 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील वडगाव येथील एक पुरुष, पाटीपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील दोन पुरुष व तीन महिला, वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील एक महिला, पुसद शहरातील सहा पुरुष व आठ महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष, नेर तालुक्यातील पिंपरी येथील एक पुरुष, वळफळी येथील एक पुरुष, वणी शहरातील तीन पुरुष व दोन महिला पॉझेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात गत 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 16 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 677 आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2168 झाली आहे. यापैकी 1430 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 58 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 135 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 63 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 34304 नमुने पाठविले असून यापैकी 33935 प्राप्त तर 369 अप्राप्त आहेत. तसेच 31767 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Related Articles

Back to top button