मराठी

सामाजिक कार्य हीच शिवसेनेची ओळख- संतोष ढवळे

खासदार भावनाताईंच्या जन संपर्क कार्यालयात शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा

यवतमाळ/प्रतिनिधी दि.२० गोरगरीबांची मदत आणि विविध सामाजिक कार्य हीच शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनेची ही ओळख अस्पष्ट होऊ देऊ नका. स्वताला सामाजिक कार्यात झोकून द्या असे आवाहन शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केले. ते यवतमाळ येथे खासदार भावनाताई गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते.
आज शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन यवतमाळात उत्साहात साजरा करण्यात आला. यवतमाळ येथे खासदार भावनाताई गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी शिवसैनिकांनी उपस्थित राहून ध्वजवंदन केले तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी शिवसेनेचा जयघोष सुध्दा करण्यात आला. शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, शहर प्रमुख पिंटु बांगर  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. एंशी टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण अशा धोरणानुसार चालणारी शिवसेना गरीब, हतबल नागरीकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. त्यामुळेच शिवसेनेची समाजात वेगळी अशी ओळख आहे. आज सामाजिक कार्यात सदैव समोर राहण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला. संतोष ढवळे यांनी सुध्दा शिवसैनिकांना गोरगरीब नागरीकांच्या मदतीला धाऊन जाण्याचा सल्ला दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हारार्पण केल्यानंतर शिवसेनेचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी यवतमाळ विधानसभा शिवसेना संपर्कप्रमुख संतोष ढवळे, शिवसेना शहरप्रमुख पिंटू बांगर, शिवसेना तालुकाप्रमुख गुणवंत ठोकळ, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसन्न रंगारी, संजय कोल्हे, युवासेना तालुकाप्रमुख पवन शेंद्रे, युवासेना शहरप्रमुख भुषण काटकर, अतुल भाऊ, दिनेश इंगळे, गणेश गावंडे, बाळासाहेब जयसिंगपुरे, दीपक सुकळकर, आशिष ढोले, ऋषभ आसकर, निखिल दांडेकर, संकेत उन्हाळे व मोठ्या प्रमाणात सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button