मराठी

सैनिक मारहाणप्रकरणी खा. पाटील यांची चाैकशी

भाजप सरकारने टाळली कारवाई

मुंबई/जळगाव दि. १५ – भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकाला केलेल्या मारहाण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. २०१६ साली उन्मेष पाटील यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता; मात्र त्याप्रकरणी तत्कालिन भाजप सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. याप्रकरणी निवदेन आल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.
भाजपचे सरकार असल्याने साधी फिर्याददेखील दाखल केली नाही. २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला; परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. याबाबत आलेल्या निवेदनांनुसार आता पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आलेत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेने माजी नौदल सेना अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या कृत्यावर टीका केली, तर भाजप सतत टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील माजी सैनिक सोनू महाजन यांच्या कुटुंबीयांवर फडणवीस सरकार काळात चाळीसगावचे माजी आमदार तथा सध्याचे जळगाव भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या आदेशाने माजी सैनिक यांच्या कुटुंबीयांवर हल्ला झाला होता; तेव्हा त्यावर कारवाई का केली नाही ? सोनू महाजन यांच्या कुटुंबीयांना सरंक्षण मंत्री फोन कधी करणार, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Back to top button