गव्हाची एक कोटी हेक्टरवर पेरणी
नवी दिल्ली/दि.२१ – चांगला पाऊस पाऊस आणि थंडी सुरू झाल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. गव्हाच्या पेरणीखालील क्षेत्र एक कोटी हेक्टरवर पोचले आहे. डाळवर्गीय पिकांची पेरणी 82 लाख हेक्टरवर झाली आहे. मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सर्व पिकांच्या पेरणीच्या क्षेत्रामध्ये मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 24 लाख हेक्टरने वाढ झाली आहे.
रब्बी हंगामातील लागवडीवर कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. पिकांच्या पेरणीच्या क्षेत्रात घट न होता उलट वाढ झालेली आहे. चांगल्या आर्द्रतेचा फायदा घेऊन वेगाने पेरणी झाली आहे. रब्बी पिकांच्या लागवडीची गती पाहता केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले, की चालू हंगामातील शेतक-यांच्या उत्साहाकडे लक्ष वेधून शेती चांगली कामगिरी करेल. रब्बी पिकांच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रफळ दोन कोटी ६५ लाख हेक्टरवर पोचले आहे, जे मागील वर्षी याच आठवड्यात दोन कोटी ४१ लाख हेक्टर होते. डाळींच्या भावात वाढ झाल्याने शेतक-यांचा कल डाळवर्गीय पिकांच्या लागवडीकडे अधिक आहे. आतापर्यंत 83 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळवर्गीय पिकांची लागवड झाली आहे, तर मागील वर्षापर्यंत याच कालावधीत 64 लाख हेक्टरवर लागवड झाली होती.
गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्र ९7.२7 लाख हेक्टर आहे. गेल्या वर्षी याच काळात 96 लाख 77 लाख हेक्टर होते. मागील वर्षी आतापर्यंत 53.०8 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत तेलबिया पिकांचे क्षेत्र आता या वर्षी 55.53 लाख हेक्टर झाले आहे. तेलबिया पिकांमध्ये मोहरीची सर्वाधिक लागवड झाली असून ती आतापर्यंत २२ लाख 78 हजार हेक्टर आहे.