मराठी

अतिपावसाने सोयाबीनला फुटले कोंब

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

  • ३३ टक्यांपेक्षा जास्त नुक्सान

चांदूररेल्वे  दी २४ : यावर्षी चांगले पिकेल या आशेने दरवर्षी मेहनत घेत शेतकऱ्यांच्या हाती यावर्षी सुद्धा निराशाच आल्याचे पाहायला मिळत आहे. अति पावसाने उडीद, मुंग या पिकांबरोबर सोयाबीनही हाताचे गेले असून ठिकठिकाणी सोयाबीन शेंगाला कोंब फुटले असल्याने खोडळीच्या प्रकोपातुन कासबसे वाचलेले सोयाबीन सतत च्या पावसाने खराब केले असल्याची व्यथा शेतकरी मांडत आहे.
तालुक्यात 25 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात सोयाबीनचा पेरा आहे, सुरवातीला पेरणी पासून वेळोवेळी चांगला शेतीयोग्य पाऊस आल्याने या वर्षी सर्वेच पीक चांगले होते परंतु पीक कापणी वेळी पावसाने चांगलाच जोर धरल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेले उडीद, मुंग, तिळ हे पीक हातचे गेले असतांना, शेतकऱ्यांची आस सोयाबीन वर होती परंतु गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे वाळलेल्या सोयाबीन च्या शेंगामधून आता कोंब फुटायला लागले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घासही या पावसाने खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने आमला परिसरातील संत्राचे मोठ्या प्रमाणात नुक्सान केले आहे तर तब्बल महिन्याभरापासून सुरू असलेला पाऊस अजूनही थांबायचे नाव घेत नाही आहे. सोयाबीन पिकांचे शंभर दिवसाचा कालावधि पूर्ण झाला असतांना सतत च्या पावसामुळे अजूनही अने• झाडे व त्याच्या शेंगा ह्या हिरव्याच आहे तर हिरव्या दाण्यातूनच आता सोयाबीन चे कोंब बाहेर येऊन त्यांना पाने फुटत आहे. पंधरा दिवाअगोदार भरगोस पिकांचे स्वप्न पाहणा-या शेतकऱ्यांची सध्या वावरात जयचीही हिम्मत होत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. कोरोना मुळे पहिलेच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची यावर्षीची दिवाळीही अंधारात जाणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

Back to top button