मराठी

मोदी यांच्या हस्तेआज दोन मुलींचा खास सन्मान

नवी दिल्ली दि २५ – पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात नम्या जोशी हिचा सन्मान करतील. 14 वर्षांची नम्याने संगणकाच्या क्षेत्रात नवोपक्रम केला आहे. गुरवीन कौर सीबीएसई 12 वी परीक्षेची अखिल भारतीय द्वितीय टॉपर आहे. राजपथावर होणार्‍या परेड दरम्यान देशातील या दोन मुली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतील. त्यातील एकीचा पंतप्रधानांकडून सन्मान होईल, तर दुसरी पंतप्रधानांसोबत पीएम बॉयसमध्येअसेल.
नम्या आणि गुरवीन कौर या पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या दोन्ही मुलींच्या कर्तृत्वाचा त्यांच्या कुटुंबातील सदस्य, जिल्ह्यातील नागिरकांना अभिमान वाटतो. 14 वर्षांच्या नम्याने संगणकाच्या क्षेत्रात नवोपक्रम केला आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला यांनीही तिचे कौतुक केले आहे. आता मोदी तिचा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सन्मान करतील. नम्याने माइंड क्राफ्टमध्ये 100 हून अधिक पाठांची निर्मिती केली आहे. तिने एक हजारांहून अधिक शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यूट्यूब चॅनलवर तिच्याकडे 169 पेक्षा जास्त पाठ आहेत. सतपाल मित्तल शाळेत आठवीत शिकणारी नम्याची आई मोनिका जोशी शाळेतच आयटी प्रमुख आहे. वडील कुणाल जोशी यांचा आयटी व्यवसाय आहे. घरी आयटी आणि संगणक तंत्रज्ञानाच्या वातावरणामुळे लहानपणापासूनच नम्याला कॉम्प्युटरमध्येही रस होता. एके दिवशी संगणकावर गेम खेळत असताना, तिने विचार केला, की हा खेळ शिकण्यासाठी का वापरू नये. गुरवीन कौर सीबीएसईची अखिल भारतीय द्वितीय टॉपर आहे गुरवीन कौरने बीआरएस नगरमधील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमधून 12 वी केले आहे. तिने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत देशभरात द्वितीय क्रमांक मिळविला. या कर्तृत्वामुळे गुरवीन हिला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पीएम बॉयसमध्ये बसण्याची संधी मिळत आहे. गुरवीनचे वडील गुरिंदर पाल सिंह हे वकील आहेत. तिची आई बलविंदर कौर डायटिशियन आहे.

Back to top button