युवासेना आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते बक्षीस वितरण
यवतमाळ/दि.४ – युवासेनेने आयोजित केलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वक्तृत्व स्पर्धेला यवतमाळ शहरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सुरज ढाकुलकर याने प्रथम पुरस्कार पटकविला. यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री तसेच राज्याचे वनमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
एखाद्याजवळ उदंड ज्ञान असते; पण ते इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेली शब्दशक्ती नसते. अनेकांजवळ शब्दशक्ती असते, पण ज्याच्यासाठी ती वापरायची ते ज्ञान नसते. बोलणे हा केवळ जगाच्या व्यवहारातील उपचाराचा भाग नाही. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती आणि पर्यायाने त्या समाजाचे उन्नयन होत असते. समाजात आज चांगले वक्तृत्व असणा-या तरुणांची गरज आहे. त्यामुळेच युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल गणात्रा यांनी यवतमाळ येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले. दिनांक 3 आक्टोंबर रोजी विश्राम गृह येथे या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना वक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हयाचे पालकमंत्री शिवसेना नेते संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. याप्रसंगीनगराध्यक्ष कांचन चौधरी, माजी आमदार व माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब मुनगिनवार, बाळासाहेब चौधरी,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, शिवसेनागटनेते गजानन इंगोले, महिला आघाडी जिल्हा समन्वयक सागरताई पुरी, जिल्हा संघटिका निर्मलाताईविनकरे, जिल्हा संघटिका मंदाताई गाडेकर, वाहतूक सेनेचे शैलेश गाडेकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख विशालगणात्रा, युवासेना शहर संघटक बिल्ला सोळंकी, महिला शहर संघटिका कल्पना दरवई तसेच नगर सेवकउद्धवजी साबळे, पंकज देशमुख, निलेश बेलोकर, अनिल यादव, रवी राऊत, वैशाली कनाके, संजय कोल्हेप्रामुख्याने उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन विशाल गणात्रा, उपजिल्हा युवा अधिकारी यांनी केले. सुरज ढाकुलकर याने प्रथम पुरस्कार, संकेत मिलिंद तंबाखे व्दितीय पुरस्कार, यश मंजुश्री किशोर चव्हाणयाने तृतीय पुरस्कार प्राप्त केला. आकांशा राऊत, ऋषभ जावके, गौरव उंबरकर, भीमराव शिरसाट, सानवीप्रमोद घाटे (वर्ग दुसरा), कु. अमृत चव्हाण यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रवीण पांडे निवासी उपजिल्हा प्रमुख यांनी काम पाहीले.