मराठी

उपविभागीय अभियंता च्या आश्र्वासनने ऋषिकेश वाघमारे चे आंदोलन मागे…

परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंजनगांव सुर्जी/दि.२९ – तालुक्यातील ग्रामिण भागाला जोडणारा रस्त्यांच्या मधात लखाड ते खिराळा रस्ताच्या मध्यभागी चांदसूर्या नदिवरिल पुलाची ऊंची वाढवण्याची मागणी घेऊन उपोषणाला बसलेल्या प्रहाचे उपतालूका प्रमुख ऋषीकेश वाघमारे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यां च्या आश्वासनानंतर काल दि.२८ उपोषण मागे घेण्यात आले.
     तालुक्यातील चिंचोणा, निमखेड बा.,हिरापुर, खिराळा व संह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बहुल सावरपाणी या गावांना जोडणारऱ्या मार्गावर असलेल्या चांदसूर्या नदिवरिल पुलाची ऊंची वाढवण्यासाठी प्रहारचे उपतालूकाप्रमुख ऋषीकेश वाघमारे यांनी काल दि.,२८ ला उपोषण सूरू केले होते या पुलावरुन दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. ही नदि सातपूड्यातून वाहत असल्याने पहाडात पाऊस पडला की काही वेळातच नदिला पुर येतो.आणि या चार पाच गावातील नागरिकांचा संपर्क तूटतो. नदिला प्रचंड ओढ असल्याने कुणी नदिपात्र ओलाडायची हिंमंत करित नाही. त्यामुळे पुर ओसरण्याची वाटच नागरिकांना पहावी लागते.आजपर्यंत अनेक लहान मोठ्या लोकप्रतिनीधीनी पूलाची ऊंची वाढवण्यासाठी आश्वासने दिली पण ती फक्त आश्वासनेच ठरली. त्यासाठीच काल प्रहारचे उपतालूका प्रमुख वाघमारे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला.यावेळी उपोषणाला पाचही गावातील नागरिकांचा प्रंचड उत्साह होता. बांधकाम विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चर्चेनंतर सायकांळी उपविभागीय अभियंता डि,एस.मांगे साहेब यांनी लेखी पत्र देऊन सर्व वरिष्ठ स्तरावर तात्काळ पाठपुरावा करु असे आश्वासन दिल्यानंतर काही काळासाठी उपोषण स्थगीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपोषण मंडपाला तालूक्यातील आंदोलनास शाळेतील विध्यार्थानचा पांठीबा दिला असुन तोडगा न निघाल्यास आंदोलन तिव्र करुन आमरण  असा ईशारा ऋषिकेश वाघमारे दिला असुन उपोषनाला प्रेमकुमार बोके, अरुण शेवाणे, प्रशात घुसे, सुधीर अढाऊ ,गजेन्द्र मंडलीक, उमेश काकड, शिवदास मते, गजानन आठवले, मो.मोईन, सनि शळके,मो.मोईन, सनि शळके,सत्यप्रकाश वाघमारे, वेदप्रकाश बोचरे,रविन्द्र बचके,यांच्या सह अनेकानी पांठीबा दर्शविला तर उपोषनात प्रहार चे तालुका प्रमुख प्रदिप निमकाळे,अनंत मते,सुजित काठोळे,दिपक अढाऊ,अनुप अढावू, अंकुश पाचघरे, अंकुश डामरे, दर्शन हिंगणकर, सुरज भिसे, नंदू खडसे यांच्या सह शकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला असुन  मागणी मान्य न झाल्यास ऋषिकेश वाघमारे यांच्या सोबत सामुहिक आमरण उपोषणाला बसण्याचा तिव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या.
उपोषणाला सुरवात झाली असतांना स्थानिक आमदारांचे एक पत्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले आणि आम्ही या अगोदरच पुलाची मागणी केली असल्याचे सांगीतले. परंतू अशी आश्वासने आणि पत्रे याही अगोदरचे आमदारांनी दिल्याने या पत्रासंबधी नागरिकांनी शंका उपस्थीत केली.
पत्र व्हायरल केल्यापेक्षा आमदारांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळाला भेट द्यायला हवी होती अशाही प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिल्या

Related Articles

Back to top button