मराठी

शाळेतील अस्थायी कर्मचार्‍यांना मानधन सुरु करा

धनंजय बोकडे यांचे निवेदन

वरुड/दि.८ – नगरपरीषद अंतर्गत सुरु असणा:या सर्व प्राथमिक शाळेतील रोजंदारी तत्वावर कार्यरत ११ महिला शिक्षणसेविकांना मानधन सुरु करा, अशा मागणीचे निवेदन आज कॉग्रेसचे नगरसेवक धनंजय बोकडे यांचे नेतृत्वात मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांना देण्यात आले.
नगरपरीषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर रोजंदारी तत्वावर या ११ महिला कर्मचारी बेरोजगार होवुन त्यांचेवर उपासमारीची पाळी आलेली आहे. विशेष म्हणजे गेल्या ६ महिन्यापासुन एक रुपया सुध्दा मानधन नगरपरिषदेने यांना दिले नाही. या महिला कर्मचारी याच नगरपरीषद तर्फे मिळणा:या मानधनाच्या भरवशावर आपली उपजिविका व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मात्र कोरोना महामारीत अचानक आलेल्या संकटादरम्यान नगरपरिषद प्रशासनाने सुध्दा यांचेकडे दुर्लक्ष केल्याने यांचेवर उपासमारीची पाळी आली आहे. यामुळेच आज नगरसेवक धनंजय बोकडे यांचे नेतृत्वात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. आणि सदर निवेदनावर मुख्याधिकारी यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. जर गुरुवारपर्यंत या ११ बेरोजगार महिलांच्या समस्येवर तोडगा न निघाल्यास हा मुद्दा सुध्दा सोमवार पासुन करण्यात येत असलेल्या उपोषणात समाविष्ट करण्यात येईल असा इशारा सुद्धा नगरसेवक धनंजय बोकडे यांनी दिला आहे.
निवेदन देतेवेळी रोजंदारी तत्वावर कार्यरत असलेल्या सुप्रिया देशमुख, वृषाली भुते, माया साखरे, नुरजहा बी, अर्चना पांडव, अकबरी बानो, अंजली माकोडे, वंदना गावंडे, वृषाली झोड, रश्मी काळे व पुष्पा खोडस्कर उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button