अमरावती दि २३ – राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र सध्या कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे, कोरोना संसर्गामुळे अनेकांचे जीव गेले,त्यातच राज्य शासनाने विद्यार्थ्यांचा कुठलाही विचार न करता शाळा सुरु करण्यास परवानगी दिली, यामध्ये फक्त शिक्षणाचे बाजारीकरण करणार्यांचे दुकान सुरू करण्यासाठी राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असल्याचा आरोप गुरुदेवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे, कोरोना महामारी चे थैमान भारतातून हद्दपार झाल्याशिवाय शाळा व महाविद्यालय सुरू करू नका अशा मागणीचे निवेदन गुरुदेव युवा संघाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले
काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावी वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली, विद्यार्थी हे उद्याचे उज्ज्वल भविष्य आहे, त्यातच त्यांचा तिळमात्र विचार न करता राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली, इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शिक्षणाचे बाजारीकरण केले आहे, त्यातच पालकांकडून अव्वाच्यासव्वा पट शाळेची फी आकारून वसुली करण्याचे काम सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून सुरू आहे, शाळा सुरू करण्याचा निर्णय फक्त इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या संचालकाच्या हिताचा असल्याचा आरोप यावेळी गुरुदेव संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केला आहे,
सध्या भारतात कोरोनाविषाणूने थैमान घातले असून मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, सरकारने त्यांच्या राज्यात टाळेबंदी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत,यातच महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली मात्र यवतमाळ शहरातील कोरोना रुग्णांचे आकडे जरी कमी असले तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे मत मनोज गेडाम यांनी यावेळी व्यक्त केले, त्यातच इंग्रजी माध्यमांच्या शाळा प्रत्येक वर्षी पालकांकडून अव्वाच्या सव्वा पट फी आकारते, ऑनलाईन क्लासेस च्या नावावर सुद्धा पालकांना फी साठी सतत तगादा लावत असल्याचा जात आहे, त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून कोरोनाविषाणू भारताबाहेर गेल्या शिवाय राज्यातील कुठली शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देऊ नये अशा मागणीचे निवेदन गुरुदेव संघाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.