मराठी

कोरोना रुग्णास शेंदोळा स्टेट बँकेचा  दिलासा

जिल्ह्यात पहिलाच मेडीक्लेम मंजूर

तिवसा दि ८ – कोरोना आजाराच्या कचाट्यात सापडल्याने उपचारार्थ लागलेल्या खर्चा बाबतची भरपाई भारतीय स्टेटबँक शाखा शेंदोळा (खुर्द) यांनी आरोग्य विमा योजने अंतर्गत मंजूर करून रवींद्र निंघोट याना शाखा व्यवस्थापक अर्चना दिलीप बावणे यांनी धनादेश देऊन दिलासा दिला.
कोरोना आजाराच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या अनेकांचे कुटुंब आर्थिकते अभावी हतबल झाले मात्र रवींद्र निंघोट यांनी स्टेट बँकेची आरोग्य विमा कुटुंबासह काढल्या मूळे त्यांनी आजारा दरम्यान उपचारार्थ लागलेला खर्च विवरण बँकेत सादर केले असता शाखा व्यवस्थापकांनी सजगता दाखवत प्रकरण वरिष्ठांकडे पाठवुन मंजुरात मिळविली व रवींद्र निंघोट याना 63 हजार, पत्नी 55 हजार व मुलगा 20 हजार असा ऐकून 1 लाख 38 हजार रु चा धनादेश व्यवस्थापक बावणे सह सुनील पूरसे, व मदतनीस राजू वानखडे यांनी विमाकर्त्याला सुपूर्द केला. कोरोना आजाराची उपचार भरपाई  तात्काळ देणारी अमरावती जिल्यातील पहिली बँक ठरली आहे.

Related Articles

Back to top button