मराठी
राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई/दि.२८– कोरोनाचा शिरकाव राज्याच्या मंत्रीमंडळात वेगाने होताना दिसतोय. दरम्यान आता राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. सध्या मुख्य सचिव घरीच क्वारंटाईन आहेत.मुख्य सचिव हे अनेक बैठकांना हजर असल्याने प्रशासनाची सध्या चिंता वाढली आहे.
मागील आठवड्यात मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला ते हजर होते. यापूर्वी अनेक प्रधान सचिव आणि सचिव दर्जाच्या अधिकार्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
या पार्श्वभुमीवर मंत्रालयात आता विशेष काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना सौम्य लक्षण जाणवत असल्याने संजय कुमार यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली होती. सौम्य लक्षणे जाणवू लागल्यापासून ते स्वत: विलगीकरणात गेले होते. आज त्यांचा कोरोना अहवाल आला.