मराठी

सिटीबस पर्यावरण संरक्षणाचा खरा मार्ग सिटी बसेस बाबत राज्यभरातील पर्यावरण संस्था राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार 

अमरावती/दि. 7 – 5 जून या आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त अनेक उपक्रम दरवर्षी साजरे होतात जैसे की झाडे लावणे, त्यांचे संवर्धन व औद्योगिक क्षेत्रांना मर्यादा असाव्यात अशा प्रमुख मुद्द्यांना पर्यावरण संरक्षणात महत्वाचे स्थान नेहमी असते मात्र शहरी सार्वजनिक वाहतूक आजच्या पर्यावरण संकटावर उपाय कसे असू शकतात यावर चर्चा होतांना तशी दिसत नाही व याच मुद्याला समोर ठेवत “लाख को पचास” या मोहीम अंतर्गत परिसर द्वारे राज्यस्तरीय ऑनलाईन चर्चेचे आयोजन करण्यात आले ज्यात 20 पेक्षा अधिक संस्था व शेकडो पर्यावरण कार्यकर्त्यांनी ऑनलाईन झूमच्या माध्यमातून हजेरी लावली.

अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, अकोला अशा अनेक शहरात काम करीत असलेल्या पर्यावरणवादी संस्था या चर्चेत सहभागी झाल्या. चर्चासत्र हे तीन विभागात विभागले होते त्यात पहिल्या भागात परीसरच्या स्वाती पाठक यांनी PPT द्वारे सिटीबसेस कशा पद्धतीने झाडे, पाणी, हवा, जैवविधात आणि जमिनीचे संरक्षण करते हे समजाविले व सहा प्रश्न पोल द्वारे विचारण्यात आले ज्यात उड्डाणपूल, मोठे रस्त्यांमुळे ट्राफिक कमी होतो का ? यामुळे प्रदूषण वर काय फरक पडतो ? सिटी बसेस मुळे प्रदूषण कसे कमी होईल ? शहरी सार्वजनिक वाहतूक हे शाश्वत विकासाचे माध्यम कसे असेल ? असे काही प्रश्न विचारले. त्यांच्या PPT सादरीकरणाद्वारे जगभरात सिटी बसेसची संख्या कशी जास्त व महाराष्ट्रात ती कमी असल्यामुळे त्याचा आपल्याला व आपल्या पर्यावरणाला कसा धोका होतोय हे त्यांनी समजाविले. महाराष्ट्रात एकूण तीन कोटी खाजगी वाहने आहेत तर फक्त 6,500 सिटीबसेस आहेत तेव्हा वाहनांमुळे निर्माण झालेल्या पर्यावरण अडचणीवर त्यांनी चर्चा केली. चर्चासत्रात सिटी बसेस व पर्यावरणाला आधारित काही प्रमुख मुद्दे उपस्थित केल्यागेले ज्यात अमरावती येथून NEERI अमरावती तर्फे यशराज इंगोले यांनी खाजगी वाहनांची मालकी व त्यामागील मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे तेव्हाच लोक सार्वजनिक वाहतुकी कडे वळतील असे सांगितले. प्रा. रश्मी माने,  युगंधर फाउंडेशन सोलापूर यांनी बससेची वारंवारिता वाढणे गरजेचे आहेत त्यामुळे लोक सार्वजनिक वाहतुकी कडे वळतील असे मत व्यक्त केले. अर्बन रिसर्च फाऊंडेशन चे श्रीनिवास देशमुख यांनी लोकांना जर सार्वजनिक वाहतुकीकडे वळवायचे असेल तर सिटी बसेसला “ब्रांड” बनविणे गरजेचे आहे. ज्यामुळे सर्वच स्तरावरील लोकांना सार्वजनिक वाहतुकीकडे येण्यास प्रवृत करता येईल. अरण्यम अमरावतीचे सर्वेश मराठे यांनी रस्ते, उड्डाणपूल बांधल्याने ट्राफिक कमी होणार नाही त्यासाठी शासकीय संस्थांना निधी तसेच संशोधक व नवीन तंत्रज्ञानाच्या मार्गावर आपण शाश्वत विकासाकडे मार्गक्रमण करू शकतो असे मत व्यक्त केले.  भारत छेडा यांनी PPP मॉडेल द्वारे सिटीबससेला इलेक्ट्रॉनिक, सोलर पद्धतीने स्वस्त अथवा मोफत करू शकतो, ज्यामुळे लोक बसेसचा वापर करतील व त्यामुळे इंधन बचत व पर्यावरण संरक्षण होईल असे सांगितले. चर्चेत 20 पेक्षा जास्त संस्था सहभागी होत्या ज्यांनी सिटी बसेस ह्या पर्यावरण संरक्षणाचा उत्तम मार्ग असू शकतात व त्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मेट्रो सारख्या प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च केल्यापेक्षा सिटीबसेस वर काही खर्च केला तर आपण शाश्वत विकासाकडे जगाला नेऊ शकतो असे मत व्यक्त केले.

तसेच ह्या सर्व संस्था येत्या काळात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सिटीबसेसच्या संख्या वाढाव्यात या करिता पाठपुरावा देखील करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास तातड, राज्य समन्वयक परिसर यांनी केले असून स्वाती पाठक यांनी सार्वजनिक वाहतूक व पर्यावरण यांचा संबंध या विषयी मार्गदर्शन केले तसेच परिसर संस्था संस्थापक सुजित पटवर्धन, रंजित गाडगीळ,  तसेच अन्य सदस्य व परिसर शहर प्रतिनिधी उपस्थित होते. सम नेटच्या ‘लाख को पचास’ या मोहिमे अंतर्गत या वेबिनार चे आयोजन करण्यात आले असून परिसर ही मोहीम मागील एक वर्षापासून राज्यभरात राबवत आहे. या वेबिनारला मोठ्या संख्येने पर्यावरणवादी संस्था उपस्थित होत्या. सोबतच विद्यार्थी, पर्यावरण विषयाचे अभ्यासक देखील सहभागी झाले होते. “लाख को पचास” हि मोहीम 1 लाख लोकसंख्येसाठी ५० सिटी बसेस असाव्यात असे आव्हान करते. सदर वेबिनारचे संचलन परिसरची प्रोजेक्ट असोशिएट स्वाती पाठक व राज्य समन्वयक विकास तातड यांनी केले. सदर चर्चासत्र आपण या लिंक वरती https://fb.watch/5Zq3GqAh4Q/ किंवा  परिसराच्या फेसबुक पेज ला जाऊन बघू शकता.

“लाख को 50” मोहिमेची स्थापना सस्टेनेबल अर्बन मोबिलिटी नेटवर्क (सम नेट) – व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि नागरी संस्था तसेच सर्व देशभरातील शाश्वत शहरी वाहतुकीच्या उपायांना चालना देणारी चळवळ – यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button