मराठी

भूमिपूजनाच्या वेळी पाकिस्तानला पोटदुःखी

 इस्लामाबाद: अयोध्येत आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडत असताना पाकिस्तानला पोटदुखी झली. केंद्रीय मंत्री शेख रशीद अहमद यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्यावर भारतावर टीका केली. भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नसून ‘राम नगर‘ झाला असल्याची खोचक टीका त्यांनी केली. त्यांनी म्हटले आहे, की जगाच्या नकाशावरून आता एक सर्वांत जुने धर्मनिरपेक्ष राष्ट्र हटले आहे. भारत आता हिंदुत्ववादी देश झाला आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर भारतात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असून त्यात वाढ झाली आहे. पाकिस्तान आणि जगभरातील मुस्लिम काश्मिरी जनतेसोबत असल्याची टिमकी त्यांनी वाजवली. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदु, शीख व अन्य समुदायांवर हल्ले होत आहेत. अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळावर पाकिस्तानमधील धार्मिक कट्टरवाद्यांकडून हल्ले सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी इम्रान खान यांच्या सरकारने श्रीकृष्ण मंदिरासाठी निधी दिल्यानंतर मुस्लिम धार्मिक कट्टरवाद्यांनी सरकारवर टीका केली होती. त्याशिवाय, गुरुद्वारही काही कट्टरवाद्यांनी ताब्यात घेतले होते. गेल्या वर्षी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर शेख रशीद यांनी भारताला धमकी दिली होती. पाकिस्तानकडे अणूबॉम्ब असून भारतावर आम्ही हल्ला करू शकतो, अशी धमकी दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button