मराठी
शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणे थांबवा अन्यथा फटके मारो आंदोलन
डॉ. अनिल बोंडे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्याला फटकारले
अमरावती/दि. २९ – बँक ऑफ महाराष्ट्र ने अमरावती जिल्हातील सर्व थकीत खातेदारांचे बँक खाते गोठविले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नवीन कर्ज, विमाची रक्कम किव्हा शेतमाल विकून आलेली रक्कम शेतकऱ्यांना वापरता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरी,बियाणे, खताचे पैसे देण्यासाठी अडचणीत आला आहे. या बँकेची मजल एवढ्या पर्यंत गेलेली आहे कि, चालू कर्जामध्ये म्हणजेच १५ दिवसापूर्वी मिळालेल्या विम्याची रक्कम वळती करण्यात आली आहे. याचा अर्थ बँक ऑफ महाराष्ट्राने शेतकऱ्यांना चोर दरोडेखोर समजून शेतकऱ्यांचे खाते गोठवण्याचा व्यवहार करीत आहे. बँकेनी खाते गोठवून हा शेतकऱ्यांचा अपमान असून त्याचे व्यवहार थांबवून हालअपेष्टा करण्याचा प्रयत्न आहे. बँकेमध्ये शेतकरी गेल्यानंतर झोनल कार्यालयातूनच गोठविण्यात आले आहे. असे सांगून शेतकऱ्यांची बोळवन केल्या जात असल्याचे माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.
दुर्दैवाने राज्यस्तरावर SLBC ची व जिल्हास्तरावर DLBC ची बैठक घेण्यात आली नाही. किव्हा बँकेने अशी कारवाई करण्यापूर्वी राज्यसरकार व जिल्हा प्रशासनाला कळविल्याबाबत माहिती नाही. थकीत कर्जासाठी बचत खाते गोठविणे संपूर्णत गैर आहे. त्यामुळे राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने तातडीने नोंद घेऊन पूर्ववत व्यवहार सुरु करण्यात यावे. अन्यथा बँक ऑफ महाराष्ट्र समोर फटके मारो आंदोलन करण्याचा इशारा बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक याना माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष भाजपा नेते डॉ. अनिल बोंडे यांनी दिला.