मराठी

भाकरी मिळत नाही, कुत्री मारून खा !

उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचा अजब आदेश

प्योंगयांग/दि. १८ – घातक शस्त्रे निर्मिती करून बाह्य शक्तींपासून देशाच्या संरक्षणावर भर देणारया उत्तर कोरियात सध्या अन्नधान्याची टंचाई जाणवत आहे. खाद्यान्न संकटावर मात करण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढवण्याऐवजी आता कुत्र्यांना ठार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुत्र्यांचे मांस जेवणासाठी वापरण्यात येत आहे. या वर्षी जुलै महिन्यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा, अध्यक्ष किम जोंग उन यांनी श्वान पाळणे हे भांडवलशाहीच्या मूल्याचे प्रतिक असल्याचे सांगत श्वान पाळण्यावर बंदी घातली होती. उत्तर कोरियाच्या अधिकाèयांनी श्वान पाळणारी घरे शोधायला सुरुवात केली आहे. लोकांच्या घरातून जबरस्तीने कुत्री उचलण्यास सुरुवात केली आहे. या श्वानांना शासकीय प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणांहून हॉटेलसाठी श्वानांच्या मांसाचा पुरवठा करण्यात येतो. कोरियन बेटांवरील देशांमध्ये श्वानांचे मांस खाल्ले जाते. दक्षिण कोरियामध्ये सध्या याचे प्रमाण कमी झाले आहे. उत्तर कोरियात मात्र अजूनही श्वानांचे मांस खाल्ले जाते.

राजधानी प्योंगयांगमध्ये श्वान मांसाची अनेक रेस्टोरंट्स आहेत. श्वानांच्या मांसामुळे एनर्जी आणि स्टॅमिना मिळत असल्याचा दावा करण्यात येतो. थंडीच्या काळात भाज्यांसह याचे सूप बनवले जाते. थंडीमध्ये शरीराचे तापमान वाढवण्यासाठी हे सूप घेतले जाते. उत्तर कोरियाला बहुतांशी अन्नधान्य पुरवठा हा चीनमधून करण्यात येतो. कोरोनाच्या संसर्गामुळे चीनने सीमा बंद केल्यामुळे परिस्थिती आणखी qचताजनक झाली असल्याचे म्हटले जात आहे. त्याशिवाय मागील वर्षी उत्तर कोरियात नैसर्गिक आपत्तीही मोठ्या प्रमाणावर आली. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम अन्नधान्य साठ्यावर झाला.

साठ टक्के नागरिकांना अन्न मिळेना

संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालानुसार, उत्तर कोरियात जवळपास ६० टक्के नागरीक अन्न टंचाईचा सामना करत आहेत. अणवस्त्र आणि शस्त्र निर्मितीमुळे असलेल्या निर्बंधामुळे उत्तर कोरियाची परिस्थिती आणखी हलाखीची झाली असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

Back to top button