वरुड/दि.१० – गेल्या वर्षभरापुर्वी पासुन अमरावती-पांढुर्णा, वरुड-काटोल या रस्त्याचे काम एच.जी.इन्फ्रा कंपनीच्या वतीने पुर्ण करण्यात आले. गेल्या वर्षभरापुर्वीपासुन हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी खुले सुद्धा झाले; परंतु आपआपला हिस्सा घेवुन मोकळे झालेले राजकीय नेते मात्र मुग गिळुन गप्प आहेत. वर्षभरापासुन या रस्त्यावरील पथदिवे बंद असतांना कोणताही राजक ीय पक्ष किंवा नेते कार्यकर्ते पथदिवे सुरु करण्या संदर्भात एच.जी.इन्फ्रा कंपनीच्या अधिका:यांना जाब विचारण्यास तयार नाही. जशी स्थिती लोकप्रतिनिधीची आहे किंबहुना तिच स्थिती अधिका:यांची सुद्धा आहे. त्यामुळे तेरी भी चुप आणि मेरी भी चुप या अवस्थेमुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सविस्तर माहितीनुसार, कोट्यवधी रुपये खर्च करुन केंद्र शासनाने तत्कालीन रस्ते वाहतुक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने अमरावती-पांढुर्णा, वरुड-काटोल या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व सौदर्यीकरणाचे कार्य एच.जी.इन्फ्रा कंपनीने गेल्या १ वर्षापुर्वी पुर्ण केले. सदर बांधकाम करतेवेळी या रस्त्यावर पथदिवे, सौंदर्यीकरण, रस्त्याची देखभाल, दुरुस्तीसह इतर कामे सुद्धा याच एच.जी.इन्फ्रा कंपनीकडे सोपविण्यात आले होते. गेल्या वर्षभरापुर्वी पासुन या रस्त्याचे काम पुर्ण झाले, वाहतुकही सुरु झाली, रस्त्याचे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे झाले हे विविध ठिकाणी रस्ता क्रॅक गेल्यामुळे दिसुन येत आहे. अशा स्थितीत वरुड शहरांतर्गत येणा:या रस्त्याच्या मध्यभागात एच.जी.इन्फ्रा कंपनीने पथदिवे लावले खरे परंतु अद्यापही हे पथदिवे सुरु न झाल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
विशेष म्हणजे गेल्या ३ वर्षांपुर्वी वरुड शहरातील रिंगरोडवर काही वर्षांपुर्वी नगरपरिषदेने पथदिव्यांचे खांब व पथदिवे लावलेले होते; परंतु एच.जी.इन्फ्रा कंपनीने हे पथदिवे काढुन रस्त्याचे बांधकाम सुरु केले तेव्हापासुन शहरातील संपुर्ण रिंगरोड अंधारात आहे. नागरिकांना रात्रीबेरात्री अंधारातुन मार्ग क्रमण करित ये-जा करावी लागते. अनेकदा लुटमारीच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. रात्रीच्या सुमारास शेकडो नागरिक जेवणानंतर शतपावलीकरिता याच रिंगरोडचा वापर करतात आणि या रस्त्यावर अंधार राहत असल्यामुळे नागरिंकांमध्ये रस्त्याने फिरत असतांना भितीदायक स्थिती दिसुन येते.
गेल्या वर्षभरापुर्वी पासुन या रस्त्याचे बांधकाम पुर्ण झाले असतांना पथदिवे बंद का? पथदिवे सुरु कधी होणार? याबाबत कुणीही एच.जी.इन्फ्रा कंपनीच्या अधिका:यांना जाब विचारण्याची हिंमत करतांना दिसुन येत नाही. दुसरीकडे या रस्त्याच्या मध्यभागी असलेले दुभाजकाकरिता लावण्यात आलेले कठडे वाहन अपघातग्रस्त झाल्यामुळे अनेक ठिकाणी तुटलेले आहेत, या रस्त्याची डागडुजी व देखभाल सुद्धा याच कंपनीकडे असतांना तुटलेले कठडे अद्यापही दुरुस्त करण्यात आले नाही. त्यामुळे एच.जी.इन्फ्रा कंपनीला जाब न विचारणा:या राजकीय नेते व कार्यकत्र्यांसह अधिका:यांवर दबाव तंत्राचा वापर करणार तरी कोण? या निमित्ताने उभा ठाकला आहे.