वरुड/दि. ९ – गेल्या ५ महिन्यांपासुन कोरोनामुळे संपुर्ण जग थांबले असतांना अनेकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले असतांना येथुन जवळच असलेल्या टेंभुरखेडा या गावचे उच्चविद्या विभुषित डॉॅ.अमोल कोहळे आपल्या अतिशय व्यस्त अशा वैद्यकीय व्यवसायातुन स्वत:ला सावरत कोरोनावर मात केली आहे.
डॉॅ.अमोल कोहळे यांना गेल्या काही दिवसांपुर्वीच कोरोनाची बाधा झाली होता. त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. लगेच त्यांनी घरात स्वत:ला आयसोलेशन करुन घेतले व घरीच स्वत:च स्वत:वर उपचार सुरु केलेे. या कोरोनातुन ते लगेच दुरुस्त झाले. डॉ.अमोल कोहळे यांनी न डगमगता स्वत:वर प्राप्त केलेेले होमिओपॅथी उपचार यामुळेच त्यांनी काही दिवसांतच कोरोनावर मात केली आहे. डॉ.अमोल हे धडाडीचे डॉक्टर असुन त्यांनी होमीओपॅथीच्या माध्यमातून कोरोनावर यश प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.