मराठी

कोरोनाबाधिताचे असे लग्न !

न्यूयार्क/दि. ५ – लग्नाच्या तीन दिवस आधी लॉरेनला कोरोनाचा संसर्ग असल्याचे समजले. अशा पार्श्वभूमीवर तिचा प्रियकर पॅट्रिकने हार मानली नाही आणि लॉरेनशी विलगीकरणात राहून लग्न केले.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील दांपत्याचे लग्न विलगीकरणात राहत असताना झाले. ऑन्टारियोमध्ये राहणारे पॅट्रिक डेलगॅडो आणि लॉरेन यांनी लग्नासाठी विशेष तयारी केली; पण लग्नाच्या तीन दिवस आधी लॉरेनला कोरोनाझाल्याचे समजले. पॅट्रिकने हार मानली नाही आणि लॉरेनशी विलगीकरणात राहून लग्न केले. लग्नादरम्यान वधू पहिल्या मजल्याच्या खिडकीजवळ बसली आणि वर खाली उभे राहिले. दोघांनी 32 फूट रिबनद्वारे एकमेकांना बांधले. या माध्यमातून रिंग एक्सचेंज सोहळादेखील पार पडला. यापूर्वी त्यांचे लग्न या ना त्या कारणाने अनेक वेळा स्थगित झाले होते; परंतु आता कोणत्याही परिस्थितीत लग्न तहकूब करायचे नाही, असे पॅट्रिक आणि लाॅरेनने ठरविले. 40 पाहुण्यांनी या लग्नाला हजेरी लावली. यापैकी 10 अतिथी प्रत्यक्ष या सोहळ्यास हजेर राहिले,  तर उर्वरित 30 जणांनी सामाजिक अंतराचे भान ठेवून गाडीवर बसून हा सोहळा पाळला. हे जोडपे मे 2019 मध्ये प्रेमात पडले होते. या दोघांचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. लॉरेनच्या म्हणण्यानुसार जेव्हा मी खिडकीत वधू म्हणून बसले, तेव्हा मला वाटले की मी देवदूत आहे.

Back to top button