मराठी

मुलीच्या जन्माचा असाही आनंद !

ग्वाल्हेर/दि. ६ – येथील हेअर सलूनच्या मालकाने आपल्या मुलीच्या जन्माच्या आनंदात एक दिवस विनामूल्य केस कापले. सलमान, अरबाज खान आणि त्याचे भाऊ  हे सलून चालवतात. फक्त मुलगाच नाही, तर मुलगी झाल्यानेही कुटुंबाला खूप आनंद मिळतो, असा संदेश लोकांना कृतीतून देण्यासाठी या सलूनच्या मालकाने आपल्या सलूनमध्ये दिवसभर विनामूल्य केस कापले.
अरबाज खान आणि त्याच्या भावाने त्यांच्या दुकानाबाहेर पोस्टर लावले. यावर लिहिले होते, की मुलगी घरी आल्याच्या आनंदात आमचे सर्व सलून 4 जानेवारी 2021 रोजी विनामूल्य केस कापतील. ग्वाल्हेरमधील कुम्हारपुरा, शिवाजी नगर आणि नाडीपार टेल येथे त्यांची तीन सलून आहेत. लोकांना त्यांच्या सलूनमध्ये विनामूल्य सेवेची माहिती मिळताच तेथे कटिंग आणि दाढी करण्यासाठी रांग लागली. सलमान खान म्हणाला, की आजही बरीच घरे अशी आहेत, जिथे लोक मुलीच्या जन्मानंतर दु: खी होतात. अशा लोकांची विचारसरणी आम्हाला बदलायची आहे. 26 डिसेंबरला सलमानच्या घरी मुलीचा जन्म झाला होता. त्याच दिवसापासून, मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्याला काहीतरी अनोखे करण्याची इच्छा होती. मग त्याने एक दिवस विनामूल्य केस कापण्याचे ठरविले. लोकांनी त्याच्या या कृतीचे खूप कौतुक केले.

Related Articles

Back to top button