मराठी

युवा व्यापारयाचा अचानक मृत्यू

रामनगर परिसर ची घटना

वरुड/दि.२९ – शहरातील रामनगर परिसरातील युवा व्यापारी महेश उर्फ बाल्या बाबाराव उघडे यांचे आज सकाळच्या सुमारास निधन झाले.
महेश उर्फ बाल्या हा रामनगर परिसरातच नव्हे तर संपुर्ण तालुक्यात परिचित व्यक्तिमत्व होत. कापसाच्या व्यवसायामुळे आणि सुस्वभावामुळे महेश सातत्याने चर्चेत राहायचा. गेल्या काही दिवसांपुर्वीच त्याला अल्पसा आजार झाला आणि त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर त्याला अमरावती येथील दयासागर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ पाठविण्यात आले परंतु आज त्याची प्राणज्योत मालवली.
आज दुपारच्या सुमारास अमरावती येथेच त्यांचे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक महेशच्या मागे आई, वडिल, पत्नी, २ मुली, १ मुलगा असा बराच मोठा आप्तपरिवार आहे

Back to top button