वरुड ता.प्रतिनिधी ८.- तालुक्यात आज टेंभुरखेडा आणि वाडेगांव या ठिकाणी गळफास घेवुन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळया घटना घडल्या. याप्रकरणी वरुड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.
वाडेगांव येथील आनंद प्रकाश पुंडढ नामक २८ वर्षीय युवकाने त्याचे राहते घरी पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास आत्महत्या केली. वाडेगांव (पुनवर्सन) येथील ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आज सकाळच्या सुमारास कुटूंबातील सदस्य झोपेतून उठल्यानंतर सकाळी ९ वाजले तरी आनंदच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला त्यामुळे खोलीमध्ये डोकावुन बघितले असता आनंदने फाशी घेतल्याचे निर्दशनास आले. याप्रकरणी मृतकाचे मामा सतिश रामकृष्ण यावले यांच्या फियादीवरुन वरुड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता रवाना केला. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार करीत आहेत.
दुसरी घटना टेंभुरखेडा येथे घडली. मुळचा छत्तीसगढ राज्यातील दुर्गम येथील रहिवाशी असलेला दिलीप दिपचंद्र मरसकोल्हे हा ३३ वर्षीय इसम त्याचे टेंभुरखेडा येथील सास:यांकडे राहात होता. आज पहाटेच्या सुमारास त्यांचे राहते त्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. सकाळच्या सुमारास कुटूंबातील सदस्य झोपेतून जागी झाल्यानंतर दिलीप ह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी वरुड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली जरुड बिट जमादार सुनिल आकोटकर, मनोज कळस्कर, प्रशांत पोकळे करीत आहेत.