मराठी

अर्थमंत्र्यांनी सादर केल्या सव्वा दोन कोटींच्या पुरवणी मागण्या

नवी दिल्ली/दि.१४ –  अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी संसदेच्या मान्यतेसाठी चालू आर्थिक वर्षाची पहिली पुरवणी मागणी सादर केली. हा प्रस्ताव चालू आर्थिक वर्षात दोन कोटी 35 लाख 852 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाशी संबंधित आहे. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम (मनरेगा) च्या प्रमुख 40 हजार कोटी रुपयांच्या वाढीचा समावेश आहे. अतिरिक्त खर्चासाठी दोन कोटी ३५ लाख रुपये खर्चाला संसदेची मंजुरी आवश्यक आहे.
पुरवणी मागण्यांशी संबंधित प्रस्तावात असे म्हटले आहे, की यामध्ये एक लाख ६६ हजार 983.91 कोटी रुपये निव्वळ रोख रक्कम काढणे आणि 68 हजार 86 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाचा समावेश आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यांना महसूल तूट अनुदान म्हणून अतिरिक्त रकमेच्या वाटपासाठी सरकारने 46 हजार 602.43 कोटी रुपयांच्या मंजुरीची मागणीही केली आहे.

Back to top button