पाटणा/दि.२६ – बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा मुख्यमंत्री झाल्यास लोक जनशक्ती पक्ष त्यांना पाqठबा देईल. नितीशकुमार यांना कोणत्याही परिस्थितीत माझ्या पक्षाचा पाqठबा नसेल, असे स्पष्टीकरण लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी एका मुलाखतीत दिले. आणखी दोन दिवसांनी बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असताना चिराग यांनी लोक जनशक्ती पक्षाचे उमेदवार नसलेल्या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन आपल्या कार्यकत्र्यांना केले आहे. या पाश्र्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की नितीशकुमार यांच्या काळात भ्रष्टाचाराला चालना, गुन्हेगारीला चालना आणि जातीयवादाला चालना देण्यात आली. आपला लढा नितीशकुमार यांच्याविरोधात आहे, भाजपच्या नाही. मुख्यमंत्री दहा नोव्हेंबरनंतर पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री कधीच होणार नाहीत आणि दुसरे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात लोक जनशक्ती पक्ष-भाजप सरकार स्थापन होईल.
भारतीय जनता पक्ष व आम्ही मणिपूरमध्ये परस्परविरोधी निवडणुका लढवल्या. माझ्या विजयी आमदाराने तेथे भाजपला मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा दर्शविला. एका मताची कमतरता होती आणि आमच्या पाठिंब्याने भाजपचे सरकार स्थापन झाले, असे निदर्शनास आणून बिहारमध्ये भाजपचे सरकार नक्की येणार, असा चिराग यांनी केला. ब-याच वेळा आपण पाहिले, की केंद्र वेगळे आहे आणि राज्ये वेगळी आहेत. जरी माझा मार्ग वेगळा असला, तरी शेवटी आमचे सर्व विजयी आमदार भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतील, असे त्यांनी सांगितले. आजही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वैचारिकदृष्ट्या जोडलेला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर माझे आमदार केवळ भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतील. नितीशकुमार मुख्यमंत्री झाले, तर त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाqठबा देणार नाही, असे चिराग यांनी स्पष्ट केले. लोक जनशक्ती पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, हे त्यांनी प्रांजळपणे मान्य केले. भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचेही नाव पुढे करावे, त्यासाठी आम्ही अटी घालणार नाहीस, असे चिराग म्हणाले. मी पुढच्या पन्नास वर्षांसाठी तयारी करीत आहे, असे सांगून ते म्हणाले, की भविष्य लक्षात घेऊन प्रत्येकजण सद्य परिस्थिती पाहता तयारी करतो आणि मीसुद्धा तयारी करीत आहे. मोदी यांनी बिहारच्या निवडणुकीत माझे नाव घेतले नसले, तरी मला फरक पडत नाही. माझ्याकडे ज्यांचे चित्र आहे, त्यावर कोणीही बंदी घालू शकत नाही. बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टर्सवर मोदी यांचे छायाचित्र वापरायला बंदी असली, तरी माझ्या हृदयातील त्यांच्या स्थानावर कशी बंदी आणणार पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात माझ्या वडिलांचा उल्लेख केला. त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि असे सुंदर शब्द वापरले, की बाबा शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत होते. हे मी त्याच प्रामाणिकपणाने सांगत आहे, की पंतप्रधान माझ्या वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्याबरोबर होते. असा कोणताही दिवस नव्हता, जेव्हा बाबा अति दक्षता विभागात होते, त्या प्रत्येक दिवशी पंतप्रधान मला दोनदा फोन करायचे आणि बाबांच्या परिस्थितीची चौकशी करीत असताना डॉक्टर त्यांच्यावर काय उपचार करीत आहेत, हे ही सांगायचे. त्यामुळे माझेही त्यांच्यासोबत राहणे कर्तव्य असल्याचे चिराग यांनी सांगितले.
कंगना लढाऊ
कंगना राणावत हिच्यासोबत एका चित्रपटात काम केलेल्या चिराग यांना तिच्यासंदर्भात एक प्रश्न विचारला, तेव्हा ते म्हणाले, की कंगनाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. आम्ही एकत्र चित्रपट केला आहे. कंगना स्वत: लढाऊ आहे. हिमाचल प्रदेशातील एका गावातून आलेल्या तिने स्वत: ला अग्रणी अभिनेत्री बनविले. ती स्वत: च एक आदर्श आहे. कंगना ज्या निर्भयतेने बोलते, तिचा आदर्श लोकांनी घेतला पाहिजे. ती एकट्या सिंहिणीसारखी लढा देत आहे