जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्या विरूध्द कार्यवाही करा
प्रशासनातील अधिका:यांकडुनच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

वरुड दी ३ – कोरोनाचे संक्रमण थांबविण्याकरीता संपुर्ण राज्यात प्रशासनाकडुन उपाय योजना केल्या जात आहे मात्र तालुक्यातील पुसला गावामध्ये जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही न करता संबंधित अधिकारीच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याची लेखी तक्रार तहसिलदार यांचेकडे दिल्यानंतर सुद्धा कुठलीच कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
प्राप्त माहीतीनुसार, कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी संपुर्ण देशात संचारबंदी व जमावबंदी लागु करण्यात आली आहे. या दरम्यान जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणा:या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती शहर व जिल्हाभरातील शहरी व ग्रामीण भागाकरीता काठले आहे मात्र तालुक्यातील पुसला गावातील सेवानिवृत्त पोस्टमास्तर राजेंद्र देवते यांनी त्यांच्या मुलाच्या लग्न समारंभा प्रसंगी आर्शिवाद समारोहाचे औचित्य साधुन २५ ऑगष्ट रोजी शेकडो लोकांना एकत्रित करुन कलम १४४ चा भंग केल्याची तक्रार पुसला येथील काही जागृत नागरिकांनी तहसीलदार यांचेकडे केली होती. १२ ते १५ हजार लोकसंख्येचे गाव असतांना या गावात आजपर्यंत एकही कोरोना संक्रमित रुग्ण आढळुन आले नाही. सदर परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवुन पुसला गावातील अनेक जागृत नागरिकांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक हरी बालाजी एन, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, तहसिलदार सुनिल सावंत, तलाठी या सर्व संबंधित वरिष्ठ अधिका:यांना पुसला गावामध्ये जमाव बंदीचे उल्लंघन होत असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी तहसिलदार सुनिल सावंत यांनी सांगितले की, काही वेळातच ठाणेदारांना घटनास्थळी पाठवुन चौकशीअंती कार्यवाही करण्यास सांगतो तसेच मंडळ अधिकारी, तलाठी व गावदक्षता समितीच्या लोकांना सुद्धा पाठवतो म्हणुन सांगितले. यानंतर शेंदुरजनाघाट पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सुद्धा दुरध्वनीव्दारे माहिती दिल्यानंतर त्यांनी सांगितले की, आमचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले असुन तेथे भजनाचा कार्यक्रम सरु आहे, असे सांगुन वरिष्ठ अधिका:यांसोबतच नागरिकांची सुद्धा दिशाभुल केली. नंतर पुन्हा तहसिलदार यांना दुरध्वनीवरुन माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र देवते यांचेकडे लग्न घरी पोहचल्या त्यावेळी शेकडो नागरीक तेथे उपस्थित असतांना सुद्धा त्यांनी बघ्याची भुमिका घेऊन कुठलीच कारवाई केली नाही. महत्वाचे म्हणजे हे लग्न समारंभ एका पोलीस कर्मचारीचे घरीच पार पडल्याने हे सर्व नियमांना धाब्यावर बसवुन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न प्रशासनातील संबंधित अधिका:यांकडुनच होत असल्याने आता याबाबत जागृत नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसुलमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हापोलीस अधिक्षकांकडे केल्याने आता या प्रकरणात काय कार्यवाही होते? याकडे पुसला वासियांसह संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.