५ फेब्रुवारीला विज बिलमाफीसाठी ताला ठोको व हल्लाबोल आंदोलन
अमरावती/दि.३ – महावितरण कंपनीने लॉकडाऊन च्या काळात नागरिकांना हजारो रुपयाचे विज बिल दिले त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. उर्जामंत्री नितीन राउत यांनी 100 युनिट पर्यंत विजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी काही दिवसापूर्वी आपला शब्द फिरवला. विजबिल माफ करणे माझी जबबदारी नाही टी मुख्यमंत्री यांची जबाबदारी आहे असे वक्तव्य प्रसार माध्यमासमोर केले होते. ह्यावरूनच माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी जोरदार टोला लगावला आहे. उर्जा मंत्री म्हणतात विजबील माफ करणे माझी जबबदारी नाही टी मुख्यमंत्री यांची जबाबदारी आहे. आणि मुख्यमंत्री म्हणतात फक्त माझी कुटुंब माझी जबबदारी मग ह्या महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी कोणाची ?
विजबिल माफी व इतर मागण्याकरिता भारतीय जनता पक्ष वरुड मोर्शी तर्फे ताला ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्याचे ठरविले आहे. यामध्ये प्रामुख्याने विज बिल व कृषी पंपाचे बिल माफ करावे, बोंडअळी बोंड सड व बोगस बियाणामुळे झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाई म्हणून २५००० रु प्रती हेक्टर मदत जाहीर करावी, संरक्षित वनक्षेत्रामुळे आदिवासी वर होणारे अत्याचार थांबवा, श्रावण बाळ, संजय गांधी योजनाच्या बैठका घेऊन केसेस मंजूर करावे.व दर महिन्याला नियमित मानधन त्याना द्यावे, घरकुलचे उर्वरित टप्पे देण्यात यावे व घरकुलाचे वाटप करण्यात यावे. मतदार संघातील स्थगित असलेले संपूर्ण कामे पूर्ण करण्यात यावी. केंद्र सरकारने दिव्यांगकरीता लागू केलेली अंत्योद्य योजना राज्यात लागू करावी. अश्या मागण्यासह उपविभागीय कार्यालय मोर्शी येथे आंदोलन होणार असून माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहान नागरिकांना केले आहे.