मराठी

अप्लवयीन मुलीवर बलात्कार

दोन आरोपींना फाशीची शिक्षा

बुलडाणा/दि.१३ – चिखली येथील एका नऊ वर्षीय मुलीस पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करून जबर जखमी करणाèया सागर विश्वनाथ बोरकर व निखील लिंबाज गोलाईत या दोन आरोपींना विशेष न्यायाधीश चित्रा एम. हंकारे यानी दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावली.

२७ एप्रिल २०१९ रोजी रात्री अंदाजे एक ते दोन वाजेच्या सुमारास आरोपींनी अल्पवयीन मुलीला स्कुटीवरून पळवून नेले आणि स्मशानभूमीसमोरील मोकळ्या जागेत आळी-पाळीने बलात्कार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडीलांनी त्याच दिवशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा प्राथमिक तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यानी केला. त्यानंतरचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बाबुराव महामुनी यांनी केला. यासाठी पोलिस कर्मचारी शरद गिरी व महिला पोलिस कर्मचारी ज्योती मुळे यांनी सहकार्य केले. तपासाअंती दोषारोप पत्र येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने मुलीस पळवून नेतांना साक्षीदार शिवाजी साळवे, पंच शुभम भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कदम, डॉ. विजय खरपास, डॉ. मनीषा चव्हाण, डॉ. नूतन काळे, तसेच औरंगाबाद येथील तज्ञ डॉ. विजय कल्याणकर, डॉ. संजय पगारे, जात प्रमाणपत्रावरील साक्षीदार रवी टाले, राजू देशमुख , नायब तहसीलदार कुणाल झाल्टे, तपास अधिकारी गुलाबराव वाघ , पोलिस उपअधीक्षक महामुनी या साक्षीदारांसह पीडीत मूलीचा जबाब नोंदवण्यात आला.

साक्षी पुरावे हे घटनेला पूरक व एकमेकाशी सुसंगत असल्याने पीडित मुलीवर आरोपींनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ड. वसंत भटकर, ड. सोनाली सावजी यांनी काम पाहिले. यासाठी त्यांना पैरवी म्हणून पोलिस कर्मचारी सुनील पवार यानी सहकार्य केले. पीडित मुलीला महिला व बालकल्याण सदस्य किरण राठोड यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button