मराठी

तहसिलदार किशोर गावंडे कोरोना पॉझिटिव्ह

तहसिल कार्यालय नागरिकांकरीता ३ दिवस बंद

वरुड दि २७ – कोरोनाच्या दुस:या लाटेत तालुक्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु झाला असतांनाच कोरोना योध्दा म्हणुन कार्यकरीत असलेले नवनियुक्त तहसिलदार किशोर गावंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तहसिल कार्यालय सिल करण्यात आले असुन नागरिकांकरीता ३ दिवस बंद ठेवण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, वरुड तहसिल कार्यालयात आपल्या कर्तव्यावर हजर असतांना बुधवारला तहसिलदार किशोर गावंडे यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपुर्ण तहसिल कार्यालय सॅनिटाईज करुन सिल करण्यात आले आहे. तर बुधवार, गुरुवार व शुक्रवार हे ३ दिवस नागरिकांकरीता तहसिल कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. यावेळी तहसिलदार किशोर गावंडे यांनी दुरध्वनीवरुन माध्यमांशी बोलतांना नागरिक तसेच तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना आवाहन केले आहे की, जे कोणी त्यांचे संपर्कात ३ दिवसात आले असतील त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. याकडे दुर्लक्ष करुन कुटुंबातील सदस्यांसोबतच परिचित नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणु नये. तहसिलदार किशोर गावंडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता ईतर कर्मचा:यांमध्ये सुध्दा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात सद्य: पुन्हा काही प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असुन आजपर्यंत तालुक्यात ८०० पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागन झाली तर ४२ पेक्षा अधिक लोकांना आजपर्यंत या कोरोना महामारी दरम्यान जिव गमवावा लागला आहे. ज्यांचेवर संपुर्ण तालुक्यातील जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांनाच आता कोरोनाने घेरल्याने आता त्यांची सुरक्षा कोण करणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Related Articles

Back to top button