मराठी

खासदार राणा कुटुबातील दहा जणांना कोरोनाची लागण

आमदार रवी राणा यांच्या कुटुंबाला मोठा धक्का

अमरावती/प्रतिनिधी/दि.३
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबातील दहा सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज अहवाल आल्यानंतर स्पष्ट झाले. या सदस्यांमध्ये राणांच्या मुलांचाही समावेश आहे. राणा यांच्या मुलाची आणि मुलीची कोरोना चाचणी होकारात्मक आली. याशिवाय नवनीत राणा यांचे सासू-सासरे नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल आहेत.

Back to top button