मराठी

इंधनाच्या मागणीत दहा टक्के घट दशकातील नीचांकी मागणी

जुलैमध्ये इंधन तेलाची आयात १.२२ दशलक्ष टनांची नोंद

मुंबई/दि. २१भारत जगातील तिस-या क्रमांकाचा कच्चा तेल आयात करणारा देश आहे. जुलैमध्ये इंधन तेलाची आयात १.२२ दशलक्ष टनांची नोंद झाली. यावर्षी जुलैमध्ये भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीची आकडेवारी दहा वर्षांच्या नीचांकावर गेली. सरकारी आकडेवारीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात कच्च्या तेलाची आयात ३६..४ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. मार्च २०१० नंतरची ही पातळी सर्वांत खालची पातळी आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या पीपीएसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूमुळे नवीन निर्बंध घातल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे. मागील महिन्यात कच्च्या तेलाची आयात मागील वर्षाच्या तुलनेत ३६.४ टक्क्यांनी घटून १२.३४ दशलक्ष टनांवर आली. कच्च्या तेलाच्या आयातीत घट होण्याचा हा सलग चौथा महिना आहे.

इंधन तेलाची आयात वाढल्यामुळे भारतातील शुद्ध उत्पादनांची आयात ४६.४ टक्क्यांनी वाढून ४.०७ दशलक्ष टनांवर गेली. जुलै महिन्यात इंधन तेलाची आयात १.२२ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचली असून मागील वर्षीच्या तुलनेत एक लाख २७ हजार टन एवढी होती. दुसरीकडे, परिष्कृत उत्पादनांची निर्यात २२ टक्क्यांनी घसरली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार जुलै महिन्यात इंधनाचा वापर मागील वर्षाच्या तुलनेत ११.७ टक्क्यांनी खाली आला आहे. त्याच वेळी, जूनच्या तुलनेत ते ३.५ टक्क्यांनी कमी आहे.

डिझेल वापरामध्ये घट

आयातीमध्ये मोठा वाटा असणा-या डिझेलची मागणी मागील वर्षीच्या तुलनेत जुलैमध्ये एक टक्क्यांनी कमी झाली आहे. वास्तविक, भारतात डिझेलचा वापर वाहतूक आणि शेतीच्या कामांमध्ये जास्त आहे; पण मार्चपासून सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे त्याचा वापर घटला आहे. त्याचबरोबर जुलैमध्ये पेट्रोलची मागणीही दहा टक्क्यांनी कमी झाली.

Related Articles

Back to top button